राहुरी फॅक्टरी(वेबटीम) अयोध्या येथील प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला वर्षपूर्ती झाल्याबद्दल आज दिनांक 22 जानेवारी रोजी सायंकाळ...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
अयोध्या येथील प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला वर्षपूर्ती झाल्याबद्दल आज दिनांक 22 जानेवारी रोजी सायंकाळी राहुरी फॅक्टरी येथील कराळेवाडी येथील हनुमान मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.
अयोध्या येथे श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठाचा उत्सव गेल्या वर्षी पार पडला. यानिमित्ताने सर्वांनी जल्लोष करत हा आनंद साजरा केला.आज वर्षपूर्तीनिमित्ताने हनुमान मंदिरात महिलांनी रामरक्षा स्तोत्र व हनुमान चालिसा पठण केले.त्यानंतर भव्य महाआरती करण्यात आली व प्रसाद वाटप करण्यात आले.
आदर्श पतसंस्थेचे चेअरमन सुधाकर कदम व त्यांच्या सुविध पत्नी माजी नगरसेविका सुजाता कदम यांच्यासह असंख्य जोडप्यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली.यावेळी सुशील गोसावी, मनोज जाधव, यश आहेर , निलेश कुऱ्हाडे, सुदर्शन वाळे ,रवींद्र आवटे ,सुमित शिंदे
दत्तात्रय लहारे, श्री.कासार सोनवणे आदी उपस्थित होते.या कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत