राहुरी फॅक्टरी(प्रतिनिधी) भारताचा प्रजासत्ताक दिन उद्या २६ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यानिमित्ताने दिल्ली येथे लाल कि...
राहुरी फॅक्टरी(प्रतिनिधी)
भारताचा प्रजासत्ताक दिन उद्या २६ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यानिमित्ताने दिल्ली येथे लाल किल्ला येथे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडणार आहे.
दिल्लीत होणाऱ्या पथसंचलन कार्यक्रमासाठी राज्यातील २९ ग्रामपंचाय सरपंचांगना यासाठी विशेष अतिथी म्हणून निमंत्रण देण्यात आले आहे.त्यासाठी राहुरी तालुक्यातील आदर्श गाव गणेगाव ग्रामपंचायतीस निमंत्रण देण्यात आले आहे. सरपंच शोभा भनगडे व अमोल भनगडे हे दिल्ली येथे रवाना झाले आहेत.
देशाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत होणाऱ्या ध्वजारोहण तथा परेड संचलन कार्यक्रमासाठी झालेल्या निवडीमुळे निश्चित आनंद झाला असल्याचे भनगडे यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत