राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील महाराष्ट्रातील लोकप्रिय शिव व्याख्याते शिवचरित्रकार हसन सय्यद यांचे उद्या बुधवार दिनांक १९ फेब्...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील महाराष्ट्रातील लोकप्रिय शिव व्याख्याते शिवचरित्रकार हसन सय्यद यांचे उद्या बुधवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी शिवजयंती निमित्ताने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित महाराष्ट्राची राजधानी मुंबई मध्ये _छत्रपती शिवाजी महाराज चौक, पेणधर मेट्रो स्टेशन जवळ, सेक्टर-२७, तलोजा फेज -२, नवी मुंबई - महाराष्ट्र येथे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये भव्य जाहीर व्याख्यान संपन्न होणार आहे.
त्यामध्ये संपूर्ण शिवचरित्र संगीत कथन अवघ्या तीन तासांच्या अवधी मध्ये सादर होणार आहे, जेणेकरून उपस्थित महिला माता-भगिनी आणि लहान चिमुरड्यांना आपल्या राजांचा शौर्याचा आणि दूरदृष्टीचा इतिहास समजण्यास सहज सोपे जाईल, त्यासाठी उद्याच्या शिवजयंती निमित्ताने नवी मुंबई येथील तलोजा मध्ये शिवरायांच्या जयंती निमित्ताने ढोल-ताशे तोफा-फटाके आणि पारंपारिक पोशाखासह भव्य नियोजन करण्यात आले.
राहुरी फॅक्टरी येथील महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिवचरित्रकार समाजप्रबोधनकार हसन सय्यद यांच्या संपूर्ण शिवचरित्र कथा श्रवण करण्याचेही मुंबईकरांना आतुरता लागली आहे.
तसेच शिवजयंती निमित्ताने शिवचरित्रकार हसन सय्यद यांचे दिनांक २० फेब्रुवारी रोजी, सकाळी पुणे तर संध्या. नाशिक येथे नियोजित व्याख्यान होईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत