जामखेड(अमृत कारंडे) खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील दिघोळ फाटा मोहरी येथे चोरट्याने ९५,००० रु. किंमतीची ओ 2 पॉवर प्राईव्ह लिमिटेड कंपनीची कॉपर ...
जामखेड(अमृत कारंडे)
खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील दिघोळ फाटा मोहरी येथे चोरट्याने ९५,००० रु. किंमतीची ओ 2 पॉवर प्राईव्ह लिमिटेड कंपनीची कॉपर डी सी केबल चोरट्याने चोरून नेली आहे ही घटना खर्डा पोलीस स्टेशन हद्दीत घडली असून दि.11 फेब्रुवारी2025रोजी अज्ञात चोरट्याविरुद्ध खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यायबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार फिर्यादी संतोष रघुनाथ नागरगोजे वय(४०) वर्षे राहणार येवलेवाडी ता. पाटोदा जि.बीड यांनी खर्डा पोलीस स्टेशनला दि.११/०२/२०२५ रात्री १० वाजेच्या पूर्वी ९५,००० रुपये किंमतीची ओ २ पॉवर प्राईव्हट लिमिटेड कंपनीची कॉपर डी. सी. केबल ही खर्डा हद्दीतील दिघोळ फाटा मोहरी तालुका जामखेड येथून कोणीतरी अज्ञात चोरट्याने स्वतःचे आर्थिक फायदा करीत लबाडीचा इराद्याने खर्डा हद्दीतून चोरून नेले आहे ही घटना 5 फेब्रुवारी 2025 रोजी 10 वाजेच्या पूर्वी घडली असून दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोजी खर्डा पोलीस स्टेशनला गु.र.क्र.17/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) प्रमाणे अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर घटनेचा पुढील तपास खर्डा पोलीस करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत