राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी श्रीमती सुवर्णा योगेश पानसंबळ यांची बिनविरोध निवड करण्या...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी श्रीमती सुवर्णा योगेश पानसंबळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
आज दिनांक११ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता चिंचविहिरे ग्रामपंचायत कार्यालय येथे निवड प्रकिया पार पडली .
प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सरपंच सुधीर झांबरे व ग्रामपंचायत अधिकारी अशोक जगधने यांनी काम पाहिले. यावेळी पानसंबळ यांचा त्यांचा एकमेव अर्ज असल्यामुळे त्यांना बिनविरोध म्हणून घोषित केले. सूचक म्हणून पुष्पा राजेंद्र गीते होत्या.
निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आमदार शिवाजीराव कर्डिले मित्रमंडळाचे अध्यक्ष मारुती मच्छिंद्र नालकर यांनी विशेष प्रयत्न केले.
निवडी प्रसंगी सरपंच सुधीर झांबरे , ग्रामपंचायत सदस्य प्रतिभा गीते , पुष्पा गीते,शितल धामोरे, भगीरथ नरोडे , सुभाष पानसंबळ ,बबन धामोरे, दगडू गीते ,कार्तिक गीते, कचरू नालकर,भाऊसाहेब मुरकुटे,राजेंद्र धामोरे, शांताराम नालकर,महेश शिंदे ,रमेश शेटे, दगु गीते ,सुनील वाळके. विजय साळवे,अरुण लाहुंडे ,बंटी गीते.संदीप तरवडे.सोनू साळवे,ग्रामस्थ उपस्थित होते . निवडीनंतर माजी सरपंच राजेंद्र धामोरे यांनी सर्वांचे आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत