राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील प्रतिष्ठित क्रेन व्यवसायातील उद्योजक तथा भाजपचे जिल्हा पदाधिकारी यमनाजी आघाव यांचे वडिल कै. विठोबा अहिला...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील प्रतिष्ठित क्रेन व्यवसायातील उद्योजक तथा भाजपचे जिल्हा पदाधिकारी यमनाजी आघाव यांचे वडिल कै. विठोबा अहिलाजी आघाव (९७) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले.
कै. विठोबा आघाव यांनी सदैव धार्मिक व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर राहत बारागाव नांदूर परिसरात आपली सामाजिक बांधिलकी जपली होती. परमेश्वराने सर्वस्व दिल्याने निश्चिंत होऊन जगाचा निरोप घेणार असल्याचे सांगत कै. विठोबा आघाव यांनी माझा अंत्यविधी हा दुखाच्या सावटात नसावे अशी इच्छा व्यक्त केली होती.
त्यानुसार आघाव कुटुंबियांनी स्व. आघाव यांचे पार्थिव रथ सजवत अंत्ययात्रा काढली होती. बारागाव नांदूर येथील स्मशान भुमीमध्ये कै. विठोबा आघाव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, मुलगी व भाऊ असा परिवार होत. ते शिवाजी आघाव, भिवाजी आघाव व यमनाजी आघाव यांचे वडिल तर माधव आघाव यांचे बंधू होत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत