देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची १९८ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी क...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची १९८ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सकाळी देवळाली प्रवरा शहरातील सांवता महाराज मंदिर येथे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या मूर्तीस सर्वपक्षीयांच्यावतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर सायंकाळी डीजेच्या निनादात भव्य -दिव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील व पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी क्रांतीसुर्य युवा प्रतिष्ठाण व संत सांवता माळी युवा संघ यांनी अथक परीश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत