राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- मागील तीन दिवसापूर्वी राहुरी फॅक्टरी येथील हॉटेल प्रयाग मध्ये अचानक कंटेनर घुसल्याने दोन जण गंभीर जखमी होत मोठे नुकस...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
मागील तीन दिवसापूर्वी राहुरी फॅक्टरी येथील हॉटेल प्रयाग मध्ये अचानक कंटेनर घुसल्याने दोन जण गंभीर जखमी होत मोठे नुकसान हॉटेल प्रयाग व येथील असलेल्या वाहनांचे झाले होते.
याचीच खबरदारी घेत दर रविवारी राहुरी फॅक्टरी येथे भरणारा आठवडे बाजार हा पूर्व ठिकाणी व्हावा किंवा त्यास मोकळी जागा कारखाना प्रशासनाने करून द्यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
रविवारच्या दिवशी मोठ्या प्रमाणात परिसरातील शेतकरी व नागरिक या आठवडे बाजारात येत असतात बाजारात आलेले नागरिकांची वाहने व बाजार हा रोड टच भरला जातो त्यामुळे वाहतुकीस अडथळा काही प्रमाणात निर्माण होतो. हॉटेल प्रयाग सारखाच प्रकार त्या ठिकाणी होऊ नये याचीच खबरदारी म्हणून आठवडे बाजार हा कारखाना प्रशासनाने मोकळ्या मैदानात किंवा अन्य ठिकाणी भरावावा अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे.
नगर मनमाड रोड लगत हा बहर भरत असल्याने वाहनांची वर्दळ, बाजार करूंची धावपळ, ग्राहकांची मोठी गर्दी असते अनेक वेळा वाहतूक ठप्प, किरकोळ अपघात घडत असतात, पोलिसांनी लक्ष घालण्याची गरज आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत