राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील शेनवडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी राहुरी फॅक्टरी येथील साई आदर्श मल्टीस्टेटच्या वतीने आर्थिक...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील शेनवडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी राहुरी फॅक्टरी येथील साई आदर्श मल्टीस्टेटच्या वतीने आर्थिक देणगी देण्यात आली.
साई आदर्श मल्टीस्टेटने नेहमीच सामाजिक, धार्मिक कार्यात आपले योगदान दिले आहेत.शेनवडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत संस्थेचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी आर्थिक मदत केली आहे.यावेळी ग्रामपंचायत सरपंच नानासाहेब जाधव, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सागर शिंदे ,दीपक जाधव तसेच मुख्याध्यापक रवींद्र शिंदे, दिपाली बोलके आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्याध्यापक रविंद्र शिंदे यांनी आदर्श परिवाराचे आभार व्यक्त करत श्री.कपाळे यांचा सन्मान केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत