राहुरी(वेबटीम) सामाजिक कामात कायम पुढाकार असलेले राहुरीच्या लाईफ इन हॉस्पिटलचे धनंजय शिवाजीराव पानसंबळ यांना "एशिया इंटरनॅशनल रिसर्च य...
राहुरी(वेबटीम)
सामाजिक कामात कायम पुढाकार असलेले राहुरीच्या लाईफ इन हॉस्पिटलचे धनंजय शिवाजीराव पानसंबळ यांना "एशिया इंटरनॅशनल रिसर्च युनिव्हर्सिटी" ( महाराष्ट्र ,गोवा,कर्नाटक राज्य) यांच्याकडून बंगलोर येथे मान्यवरांच्या हस्ते डॉक्टरेट ही पदवी बहाल करून सन्मानित करण्यात आले.
धनंजय पानसंबळ यांनी ग्रामीण भागातील रुग्णाची अडचण लक्षात घेत राहुरी शहरामध्ये अद्यावत,प्रशस्त व सर्व सोयीनियुक्त असे "लाईफ इन हॉस्पिटलची" उभारणी केली .त्यामध्ये गोरगरीब रुग्णांना मोठ्या शस्त्रक्रिया, विविध रोगांवरील उपचार उपबद्ध करून दिले .किडनी डायलेसिस करण्यासाठी शहराच्या बाहेर जावे लागत असल्याने रुग्णांची होणारी परवड थांबण्यासाठी धनंजय पानसंबळ यांनी राहुरी शहरांमध्ये २४ तास निरंतर सेवा देणार"लाईफ इन हॉस्पिटल" मल्हारवाडी रोड येथे सुरू करून महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजना मार्फत केले जाणारे सर्व उपचार राहुरी मध्येच सुरू करून रुग्णांची गैरसोय दूर केली.आजमितीला या हॉस्पिटलमध्ये रुग्णांचे २० ते २२ डायलिसिस रोज मोफत केले जातात.तसेच अनेक वर्षांपासून ग्रामीण व दुर्गम भागात सर्वरोग निदान शिबीर घेऊन सर्वसामान्य जनतेला वैद्यकीय मार्गदर्शन करून जनतेची सेवा करण्याचे काम धनंजय पानसंबळ यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत