राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील हिंदू रक्षक धर्म परिषद धार्मिक व सामाजिक संघटना तसेच इच्छापूर्ती फाउंडेशन व वारकरी संप्रदाय अ...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील हिंदू रक्षक धर्म परिषद धार्मिक व सामाजिक संघटना तसेच इच्छापूर्ती फाउंडेशन व वारकरी संप्रदाय अहिल्यानगर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य वारकरी बाल संस्कार निवासी शिबिरास उद्या शुक्रवार दिनांक 2 मे पासून प्रारंभ होणार असून 10 मे पर्यंत या बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात वारकरी संप्रदायातील अनेक विषयी विद्यार्थ्यांना तज्ञ मार्गदर्शकांच्या माध्यमातून शिकविले जाणार आहेत.
तसेच राजकीय, सामाजिक, राजकीय,सांस्कृतिक,सहकार क्षेत्रातील मंडळींची देखील या वारकरी बाल संस्कार शिबिरास हजेरी लागणार असून पार पडणाऱ्या वारकरी बालसंस्कार निवासी शिबिरास परिसरातील विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन हिंदू रक्षक धर्म परिषदेचे दत्ता गाग रेयांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत