राहुरीतील प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयात महाराष्ट्र व आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीतील प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयात महाराष्ट्र व आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा

राहुरी/वेबटीम:- राहुरी शहरातील प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय येथे महाराष्ट्र व आंतरराष्ट्रीय कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्या...

राहुरी/वेबटीम:-

राहुरी शहरातील प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय येथे महाराष्ट्र व आंतरराष्ट्रीय कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

राहुरी येथील ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयात नेहमीच विविध सामाजिक धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम राबविले जाते.

१ मे रोजी महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करण्यात येऊन  यावेळी मराठी मनुष्याचा व कामगारांचा  सन्मान करण्यात आला. सर्वांचे स्वागत ब्रम्हाकुमारी नंदा दिदी यांनी केले.

यावेळी बालकलारांनी  पथनाट्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. जीविका व वेदिका यांनी स्वागत नृत्य सादर केले.

या कार्यक्रमासाठी राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे , पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ, पोलीस उपनिरीक्षक विष्णू आहेर अभियंता स्वप्नील भास्कर, राहुरी नगरपालिकेचे अधिकारी श्री. पवार, योगेश शिंदे, श्री.जाधव  संजय गोसावी आदी उपस्थित होते .


याप्रसंगी नगरपालिकेतील सर्व सफाई कामगार त्याप्रमाणे राहुरी शहरातील गवंडी , मिस्तरी यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत