राहुरी नगरपरिषद आणि "कुशाग्र"च्या वतीने शिवचरित्रकार हसन सय्यद यांचे स्वच्छता जनजागृती अभियान - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी नगरपरिषद आणि "कुशाग्र"च्या वतीने शिवचरित्रकार हसन सय्यद यांचे स्वच्छता जनजागृती अभियान

राहुरी/वेबटीम:- बुधवार, दिनांक ३० एप्रिल २०२५ रोजी, राहुरी नगरपरिषदेच्या वतीने आणि कुशाग्र फाउंडेशनच्या माध्यमातून राहुरी तालुक्याचे भूमिपुत...

राहुरी/वेबटीम:-

बुधवार, दिनांक ३० एप्रिल २०२५ रोजी, राहुरी नगरपरिषदेच्या वतीने आणि कुशाग्र फाउंडेशनच्या माध्यमातून राहुरी तालुक्याचे भूमिपुत्र असलेले देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे वसुंधरा संवर्धन आणि स्वच्छता दूत, राष्ट्रीय शिवचरित्रकार तथा समाजप्रबोधनकार हसन सय्यद यांच्या कलात्मक नियोजनातून नामवंत कलाकारांना सोबत घेवून स्वच्छतेविषयी आणि पर्यावरण सुरक्षा यावर राहुरी शहरातील एस.टी स्टॅन्ड, शनी चौक, पृथ्वी कॉर्नर, कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच शुक्लेश्वर चौक शहरातील विविध भागात पथनाट्य सादर करून जनजागृती अभियानाच्या माध्यमातून "स्वच्छ शहर, आपली जबाबदारी" आणि "स्वच्छ राहुरी, सुंदर राहुरी" चा संदेश देऊन जनजागृती करण्यात आली. 


      दरम्यान या जनजागृती अभियानास आरोग्य विभागाचे अधिकारी राजेंद्र पवार, कुशाग्र इनोवेशनचे निखिल वैवुदे, ओमकार दुधाणे, स्वप्नील चव्हाण सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान शिवचरित्रकार हसन सय्यद यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले; की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचे पर्यावरण आणि स्वच्छतेवर  प्रचंड मोठ्या प्रमाणात भारतभर जनजागृती सुरू आहे. आपला देश स्वच्छ ठेवण्यासाठी शहरातील व गावातील प्रत्येक व्यक्तीने स्वच्छते विषयी काळजी घेणे गरजेचे आहे. ओला कचरा, सुका कचरा याविषयी जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. तसेच दिवसेंदिवस पर्यावरणाचाही समतोल घसरताना आपल्याला पाहायला मिळते. आपली येणारी पुढील पिढी निरोगी ठेवायचे असेल तर प्रत्येक व्यक्तीने एक झाड लावणे खूप महत्त्वाचे आहे. झाड आपल्याला फुले, फळे, सावली सोबत ऑक्सिजन ही देतात आणि ते ऑक्सिजन आपल्या पुढील पिढीसाठी वरदान ठरणार आहे.

     

     तसेच शिवचरित्रकार हसन सय्यद पुढे म्हणाले; की आम्ही मालपाणी उद्योग समूहाचे साई तीर्थ थीम पार्क येथे एका नव्याने सुरू झालेला "मूषक महाराज" हा शो मागील सात ते आठ  महिन्यापासून साई तीर्थ थीम पार्कचे वरिष्ठ अधिकारी श्री. डॉ. संतोष खेडलेकर, श्री. सचिन डांगे व इतर अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आणि माझे सहकारी मित्र "शो" होस्ट करतोय, तर या माध्यमातून देशातून आणि विदेशातून तसेच महाराष्ट्र राज्यातून विविध ठिकाणाहून शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखोंनी भाविक येतात, त्यापैकी काही भाविक मालपाणी उद्योग समूहाचे शिर्डी येथील भारतातील पहिले अध्यात्मिक थीम पार्कला भेट देतात, तर मनोरंजनातून समाजप्रबोधन म्हणून तिथे आलेल्या भाविकांना "मूषक महाराज" शोच्या माध्यमातून  दररोज शेकडो भाविकांनी "झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाचवा, असा संदेश आता पर्यंत दीड ते दोन लाख भाविकांना संदेश देवून पर्यावरण विषयी जनजागृतीही करण्यात आली व पुढेही सुरू राहील. त्यातून अनेक साईभक्त आपल्या घरी गेल्यानंतर निश्चित रूपाने झाडे लावतात आणि इतर लोकांनाही सांगतात त्याचे फीडबॅकही साईभक्त भ्रमणध्वनीच्या माध्यमातून आम्हाला देत असतात आणि साईतीर्थ थीम पार्क येथील "मूषक महाराज" या शोच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या संदेश मुळे मालपाणी ग्रुपचे कौतुकही करतात. आतापर्यंत बीड, नाशिक, येवला तसेच राज्याच्या बाहेरील ओडीसा, आसाम दिल्ली आणि देशाच्या बाहेर सिंगापूर, मलेशिया येथून आलेल्या साई भक्त आपल्या देशात, राज्यात घरी गेल्यानंतर पर्यावरण विषयी जनजागृती करण्याचे कार्य सुरू केले आणि इतरांनाही झाडे लावण्यासाठी प्रेरणा देतात. अनेकांचे फोन कॉल्स फीडबॅक आल्यानंतर प्रचंड आनंद होतो. असे प्रतिपादन शिवचरित्रकार हसन सय्यद यांनी माध्यमांशी बोलताना आणि स्वच्छ भारत अभियान झाडे लावा झाडे जगवा  हा संदेशही दिला. 

 

          जनजागृती आभियानासाठी पुणे येथील महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरही ओडिसा, आसाम येथे प्राभावीपणे पर्यावरण व स्वच्छतेवर सामाजिक कार्य करणारे नामवंत असलेले एकमेव सामाजिक फाउंडेशन "कुशाग्र इनेवेशन" संस्थेचे, मोलाचे सहकार्य तर शिवचरित्रकार हसन सय्यद यांचे मार्गदर्शन लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत