श्री संत कवी महिपती महाराज मंदिर कलशारोहण सोहळ्याची सांगता - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

श्री संत कवी महिपती महाराज मंदिर कलशारोहण सोहळ्याची सांगता

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-   श्री संत कवी महिपती महाराज मंदिर कलशारोहण व महाविष्णू याग सोहळा भव्य दिव्य स्वरूपात मोठ्या हर्षउल्हासात संपन्न झाल...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- 

श्री संत कवी महिपती महाराज मंदिर कलशारोहण व महाविष्णू याग सोहळा भव्य दिव्य स्वरूपात मोठ्या हर्षउल्हासात संपन्न झाला. त्या प्रसंगी महंत पुंडलिक महाराज जंगले शास्त्रीजी यांची सुश्राव्य कीर्तनसेवा होऊन दहीहंडी व महाप्रसादाने सोहळ्याची सांगता झाली.

श्रीक्षेत्र ताहाराबाद येथील महिपतींच्या समाधी मंदिरासमोर जमलेली भाविकांची मांदियाळी, प्रहरा मंडपातील अखंडपणे सुरू असलेल्या हरिनाम सोहळ्याची गुरुवार दि.१ मे रोजी दुपारच्या सत्रात सांगता झाली. हा सोहळा गेली ४ दिवसांपासून चालू होता. सप्ताह काळात विविध नामवंत कीर्तनकारांनी केलेल्या कीर्तन सेवेमुळे हा परिसर अक्षरशः भक्तिमय होऊन गेला होता. विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे व कीर्तन सेवेमुळे ह्या परिसराला पंढरपूरचे स्वरूप आले होते. महाराष्ट्रातील नामवंत गायकांच्या गायनामुळे परिसर दुमदुमून गेला होता. श्री संत कवी महिपती महाराज देवस्थानचे मठाधिपती महंत अर्जुनजी महाराज तनपुरे, बाळकृष्ण महाराज कांबळे, नाना महाराज गागरे व देवस्थान समिती यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न झाला.

महंत जंगले महाराज शास्त्री यांनी काल्याच्या किर्तनात भगवंताच्या विविध लीला सांगून भाविकांना मंत्रमुग्ध केले. महाराज म्हणाले, भारतीय संस्कृतीचा महिमा अगाध आहे. जगातील सर्व संस्कृतींमध्ये हिंदू संस्कृती महान असून पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करू नका, भारतीय संस्कृतीची जोपासना करून तरुणांनी आपले आचार, विचार व उच्चार आपल्या संस्कृतीनुसारच करावे, असे आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले, स्त्री-पुरुषांना समान अधिकार देण्यात आले आहेत. मात्र, प्रत्येकाने आपापल्या संस्कृती व रूढी परंपरेचा विचार करूनच आचरण केले पाहिजे. संस्कृतीनुसारच आपली वेशभूषा असली पाहिजे, त्यामुळे भावी पिढी सुसंस्कृत होईल, मोबाईलचा वापर कमी असावा, मुलींना शिकवा, मुलींना उत्कृष्ट गृहिणी बनवा, असे त्यांनी सांगितले.


महंत तनपुरे महाराज म्हणाले, सोहळ्यात ज्ञानदान - अन्नदानाचा उच्चांक झाला. देवस्थान समितीची शब्दपूर्ती पूर्णत्वाकडे गेली. सप्ताहात तालुक्यातील विविध वारकरी संस्थांच्या विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. दानशूर दात्यांच्या सहकार्यामुळे स्वप्नात नव्हतं ते आज प्रत्यक्षात कृतीत आलं. देवस्थानची उत्तरोत्तर प्रगती होत आहे.

▶ माळशिरस तालुक्यातील लवंग येथील विजयाताई पाटील यांनी ११ तोळ्यांचा सोन्याचा कळस दिला. राजूभाऊ शेटे यांनी डिजिटल इलेक्ट्रॉनिक महिपतींचे नाव दिले. तसेच दिलीप जगताप यांनी मंडप व्यवस्था व सतीश तनपुरे यांनी काल्याच्या महाप्रसादाची व्यवस्था केली होती. संत महिपती देवस्थानचे मठाधिपती अर्जुन महाराज तनपुरे व महंत जंगले शास्त्री यांनी कलशावर पुष्पवृष्टी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत