राहुरी फॅक्टरीत जुगार अड्यावर छापा, एलसीबीची धडक कारवाई,१५ जणांवर गुन्हा दाखल - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीत जुगार अड्यावर छापा, एलसीबीची धडक कारवाई,१५ जणांवर गुन्हा दाखल

राहुरी फॅक्टरी(वेबटीम):-  राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर भागात तिरट नावाचा  जुगार पैशावर सुरू असल्याची माहिती अहिल्यानगरच्या एलसीबी पथकाला म...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम):-



 राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर भागात तिरट नावाचा  जुगार पैशावर सुरू असल्याची माहिती अहिल्यानगरच्या एलसीबी पथकाला मिळाली असता एलसीबीने छापा टाकत २०  हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत १३ जणांवर गुन्हे दाखल केले आहे.


 आज रविवारी दुपारी साडेचार वाजता प्रसादनगर भागात छबु शिंदे यांच्या राहत्या घराजवळ शेडनेट मध्ये  पत्त्याचा तिरट नावाचा जुगार  सुरू असल्याची माहिती एलसीबीला मिळताच अपोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकला.


 यावेळी या पथकाने २० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून १३ जणांवर गुन्हे दाखल केले आहे.


याबाबत विशाल आण्णासाहेब  तनपुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून छबु नारायण शिंदे रा. प्रसादनगर, प्रफुल्ल चंद्रभान ओहोळ रा.गुहा ,रावसाहेब आसाराम लोंढे रा. प्रसादनगर, अमोल गोरख साळवे रा. प्रसादनगर, करीम अहमद शेख  रा. देवळाली प्रवरा, गणेश साहेबराव लिहणार रा. प्रसादनगर,बशरद शंकर शेवंते रा. प्रसादनगर,जालिंदर बाजीराव रोकडे रा. प्रसादनगर, श्रीकांत भाऊसाहेब टिक्कल रा.चिंचविहिरे, संदीप राजाराम गायकवाड रा. प्रसादनगर,सचिन प्रकाश उदावंत रा. प्रसादनगर व इतर दोन ते तीन इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल रणजित जाधव,बाळासाहेब गुंजाळ, अमृत आढाव,विशाल तनपुरे, गणेश लोंढे आदींनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत