राहुरी(वेबटीम) शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आज मंगळवार दि.६ मे रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सुचनेनुसार मुळा धर...
राहुरी(वेबटीम)
शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आज मंगळवार दि.६ मे रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सुचनेनुसार मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सोडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आ.शिवाजीराव कर्डिले यांनी दिली.
आ.कर्डिले यांनी सांगितले की, सध्या उन्हाची तीव्रता वाढत असल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. शेतातील पिकांना आता पाण्याची गरज आहे. त्यामुळे मुळा डाव्या कालव्यातून पाणी सोडावे अशी मागणी शेतकऱ्यांनी आपल्याकडे केली होती. त्यानुसार आपण राज्याचे जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याचे आदेश देण्याची विनंती केली होती त्यानुसार पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेवरून आज दि.६ मे रोजी मुळा डावा कालव्याला पाणी सुटणार आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने शेतकऱ्यांनी व्यवस्थितपणे पाणी वाया जाणार नाही यांची काळजी घ्यावी व व्यवस्थितरीत्या पिकाला पाणी द्यावे असेही आ.कर्डिले यांनी सांगितले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत