स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार

नवी दिल्ली(वृत्तसंस्था) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका पुढील 4 महिन्यांच्या आत घ्या, असे महत्त्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायाल...

नवी दिल्ली(वृत्तसंस्था)



स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका पुढील 4 महिन्यांच्या आत घ्या, असे महत्त्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी महाराष्ट्र सरकार व निवडणूक आयोगाला दिलेत. कोर्टाने या निवडणुकांची अधिसूचना 4 आठवड्यांच्या आत काढण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बार दिवाळीपूर्वी उडण्याची शक्यता आहे.

वकील सिद्धार्थ शिंदे यांनी यासंबंधी सांगितले की, सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यांच्या आत घेण्याचे निर्देश दिलेत. कोर्टाने ही निवडणूक 1994 ते 2022 पर्यंत ओबीसी आरक्षणाची जी स्थिती होती त्यानुसार ह्या निवडणुका घेण्याचे आदेश दिलेत. निवडणूक आयोग व राज्य सरकारला येत्या सप्टेंबर महिन्याच्या आत ही निवडणूक घ्यावी लागेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत