ग्राहकसेना उत्तर अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी सुनील कराळे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

ग्राहकसेना उत्तर अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी सुनील कराळे

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- शिवसेना (शिंदे गट) उत्तर अहिल्यानगर जिल्हा ग्राहकसेना अध्यक्षपदी सुनील कराळे यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत निवड...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

शिवसेना (शिंदे गट) उत्तर अहिल्यानगर जिल्हा ग्राहकसेना अध्यक्षपदी सुनील कराळे यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत निवडीचे पत्र ग्राहकसेना अध्यक्ष अॅड. अरुण जगताप यांच्या हस्ते मुंबई येथे शिवसेना बाळासाहेब भवन मध्ये कराळे यांना प्रदान करण्यात आले.

यावेळी शिवसेना (शिंदे गट) मुख्य सचिव संजय मोरे व शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिका-यासह बाळासाहेब कदम, निलेश कराळे, विक्रम फाटे, संगम रसाळ, सोमा सरोदे, पप्पू रोटे, महेश शिरसाठ, अविनाश कणसे, शेखर ससे आदि शिवसैनिक उपस्थित होते. या निवडीचे शिवसैनिकांनी गुलाल उधळून व फटाके फोडून स्वागत केले आहे. कराळे यांच्या निवडीने शिवसैनिकांना आणखी ताकद मिळाली असल्याचे शिवसैनिकांनी सांगितले.


यावेळी सुनिल कराळे म्हणाले, उत्तर अहिल्यानगर जिल्हा ग्राहकसेना अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी पक्षाने माझ्यावर मोठी टाकली आहे. ही जबाबदारी मी समर्थपणे पेलवून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करील तसेच पक्ष संघटन जास्तीत जास्त मजबूत करुन पक्ष वाढीसाठी निश्चितपणे प्रयत्न करील, असे कराळे यांनी सांगितले.


निवडीनंतर कराळे यांनी शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन गेल्या अनेक दिवसांपासून देवळाली प्रवरासाठी स्वतंत्र पोलिस स्टेशनचा प्रलंबित असलेला प्रश्न सोडवण्यासाठी मागणी केली असता या मागणीला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी हिरवा कंदील दाखवल्याने या प्रश्नी शिवसैनिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत