राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी व परिसरात विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रम सुरू असून त्याचबरोबर हनुमान जयंतीच्या निमित्ताने आज राहुरी फ...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी व परिसरात विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रम सुरू असून त्याचबरोबर हनुमान जयंतीच्या निमित्ताने आज राहुरी फॅक्टरी परिसरात विविध ठिकाणी आ.ओगले यांनी भेटी दिल्या आहेत.
राहुरी फॅक्टरी येथील हनुमान मंदिरात मारुतीरायांचे दर्शन घेतले प्रसंगी आदर्श नागरी पतसंस्थेचे चेअरमन सुधाकर कदम, माजी नगरसेविका सुजाता कदम, वैभव गिरमे, कृष्णा कदम,राहुल ठाणगे आदी उपस्थित होते.
यानंतर प्रसादनगर येथील हनुमान मंदिरात सुरू असलेल्या सप्ताह कार्यक्रमास देखील आमदार ओगले यांनी भेट दिली यावेळी माजी नगरसेवक सचिन सरोदे,नितीन पुंड आदिंसह प्रसाद नगर व परिसरातील भाविक भक्तगण उपस्थित होते.
यानंतर आमदार ओगले यांनी हनुमान मंदिर बैलगाडी यार्ड येथील काल्याच्या किर्तनास सदिच्छा भेट दिली. प्रसंगी सप्ताह कमिटीच्या वतीने आमदार ओगले यांचा सन्मान करून ओगले यांनी सप्ताह सोहळ्यास शुभेच्छा दिल्या. प्रसंगी सप्ताह कमिटीचे सदस्य व भाविक भक्तगण उपस्थित होते.
यानंतर आमदार ओगले यांनी शांती चौक मित्र मंडळ या ठिकाणी सुरू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने पारायण व सप्ताह सोहळ्यास देखील भेट दिली.
यावेळी शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन यांनी त्यांचा सन्मान केला.
प्रसंगी आदर्श नागरी पतसंस्थेचे चेअरमन सुधाकर कदम, काँग्रेसचे वैभव गिरमे,आरपीआय राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष बाळासाहेब पडागळे, प्रकाश सोनी, सुनील विश्वासराव, जय शंभू नारायण मित्र मंडळाचे मनोज डोंगरे, सचिन साळवे,कृष्णा कदम, स्वप्निल बोरुडे,आदेश जाधव,नितीन वाघ, संजय गोसावी, सुरेश डोके, आदींसह शांती चौक मित्र मंडळाचे पदाधिकारी,सदस्य उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत