राहुरी(वेबटीम) राहुरी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरणातील आरोपींना अटक करावी या मागणीसाठी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांन...
राहुरी(वेबटीम)
राहुरी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरणातील आरोपींना अटक करावी या मागणीसाठी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शहरातील शनी चौकात सुरू केलेला उपोषणास राहुरी तालुका बार असोसिएशनच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे. विटंबना प्रकरणात जो कोणी आरोपी असेल त्याचे वकीलपत्र घेणार नाही अशा असायचा पारित केलेल्या ठरावाची प्रत बार असोसिएशच्या पदाधिकारी व सदस्यांनी प्राजक्त तनपुरे यांना दिली आहे.
या पाठींबा पत्रात बार असोसिएशनने म्हंटले की, छत्रपती शिवाजी महाराज विटंबना प्रकरणातील समाजकंटकाला तातडीने अटक करून कठोर शासन देण्यात यावे पोलीस पोलिसांनी याबाबत योग्य ते पावले उचलून परिसरातील सर्व सीसीटी फूटेज चेक करावी, कुठल्याही परिस्थितीत ज्यांनी कोणी हा प्रकार केला त्या आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड. प्रशांत मुसमाडे, उपाध्यक्ष बाळासाहेब बाचकर , ज्ञानेश्वर येवले, सहसचिव योगेश शिंदे, मोहनिश शेळके, जीवन राऊत, राहुल शेटे, अमोल डौले, प्रसाद कोळसे, बाबासाहेब खुरुद, अमोल पानसंबळ, सुनील घोगरे, किरण धोंडे, भूषण राका, निलेश धुमाळ, अजय पगारे, सुंदरबापू माने आदी वकिल बांधव उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत