राहुरी फॅक्टरी(वेबटीम) देवळाली प्रवरा नगर परिषदेने भूमिगत गटार करण्यासाठी देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी परिसरातील उत्खनन केलेले रस्ते दुर...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
देवळाली प्रवरा नगर परिषदेने भूमिगत गटार करण्यासाठी देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी परिसरातील उत्खनन केलेले रस्ते दुरुस्त करावे अन्यथा उपोषण करण्याचा इशारा माजी नगरसेवक आदिनाथ कराळे यांनी आज बुधवारी मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
या निवेदनात कराळे यांनी म्हंटले की, देवळाली प्रवरा नगरपरिषदने गटार भूमिगत करण्यासाठी काढलेल्या निविदे अंतर्गत देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी परिसरातील गटार भूमिगत करण्यात आले. सदर ठेकेदाराने गटार भूमिगत केले, मात्र या सगळ्या प्रकारात निविदेतील अटी शर्थी चे पालन झाले आहे की नाही याची खातर जमा करण्याचे साधे काम देखील नगर परिषद प्रशासनाने केले नाही. नगरपरिषदेला वारंवर सांगूनही कुठलीही कारवाई आद्यापर्यंत झालेली नाही .ह्या निविदेत जे जे रस्ते उत्खनन केले जातील ते पूर्ववत करण्याची अट नमूद केलेली होती, तिचे पालन ठेकेदाराने केलेले नाही. जिथं डांबरीकरण आहे तिथे डांबरीकरण, जिथे काँक्रिटी करण आहे तिथे काँक्रिटी करण होणे गरजेचे होते. आता ऐन पावसाळ्याच्या तोंडावर नागरिकांची ह्या रस्त्यांवरून ये जा करताना तारांबळ होताना दिसत आहे. खड्यामुळे जर अपघात झाला तर सर्व खर्च नगरपरिषद प्रशासनाने करावा. ही असुविधा टाळण्यासाठी प्रशासनाने त्वरित संबंधित ठेकेदाराला बोलवून निवेदन दिल्या पासून पुढील ८ दिवसात रस्ते पूर्ववत करावे. अन्यथा ६ जून पासून नगरपरिषदे समोर आमरण उपोषणासाठी बसण्यााचा इशारा कराळे याांनी दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत