श्रीरामपूर(संदीप पाळंदे) महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समितीतर्फे तहसीलदार श्रीरामपूर मिलि...
श्रीरामपूर(संदीप पाळंदे)
महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समितीतर्फे तहसीलदार श्रीरामपूर मिलिंदकुमार वाघ यांच्यामार्फत महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हंटले आहे की, बोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे तसेच महाबोधी विहार टेम्पल अॅक्ट १९४ हा कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी गेल्या 12 फेब्रुवारीपासून भारतीय भिक्कू संघ बेमुदत धरणे आंदोलन करत आहे. सध्या महाबोधी विहार मुक्ती आंदोलनाने जोर पकडला असून महाबोधी विहार परिसरात उपोषणे तसेच देशातील विविध भागात आंदोलने सुरू आहेत. जागतिक बौद्ध समुदायाकडून भारत सरकारला अपिले केली जात आहेत. १९४९ च्या कायद्यानुसार महाबोधी महाविहार व्यवस्थापनामध्ये नऊ पैकी फक्त चार बौद्ध व्यवस्थापक मंडळावर आहेत. जसे मशीद मध्ये मौलवी, चर्चमध्ये पादरी, गुरुद्वारा मध्ये शिख धर्मगुरू, मंदिरामध्ये हिंदू व्यवस्थापक असतात. त्याचप्रमाणे महाबोधी विहारांमध्ये ही बौद्धच व्यवस्थापनात असले पाहिजे. या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या बौद्ध भिक्षूंना व कार्यकर्त्यांना बिहार पोलीस प्रशासनाने बेकायदेशीर अटक करून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहे. हे गुन्हे तात्काळ रद्द करून सर्व भंतेजी व कार्यकर्ते यांना सरकारने मुक्त करावे व १९४९ चा महाबोधी महाविहार व्यवस्थापन कायदा रद्द करावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष सुगंधराव इंगळे, जिल्हा महासचिव अशोकराव बोरुडे, ऑल इंडिया बुद्धिस्ट नेटवर्कचे राजेश हिवाळे, भारतीय कर्मचारी संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रमेश मकासरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश बोर्डे, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे डॉ. सलीम शेख, युनायटेड मुस्लिम फोरमचे जिल्हाध्यक्ष मुश्ताकभाई तांबोळी, विद्रोही विद्यार्थी संघटनेचे एड. ॲड. अमोल सोनवणे, भारतीय स्वाभिमानी संघाचे सुधाकर बागुल, भारतीय कर्मचारी संघाचे संदीप पाळंदे, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे भीमराव कदम, कवी आनंदा साळवे, दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष संजय साळवे, ऑल इंडिया बुद्धिस्ट नेटवर्कचे कार्यध्यक्ष ॲड. अण्णासाहेब मोहन, दलित पॅथरचे संजय वाहुळ, अण्णासाहेब झीने, जेतवन बौद्ध विहार समितीचे अमोल शेळके, पंकज शेळके, बापू दादा शेळके, रवी बोर्डे, भारत शिंगे, विजय जगताप, एन.डी. साळवे, जे. डी. पठारे, राजीव शेळके, ए. आर. शेळके, भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक भाऊसाहेब हिवराळे, के. सी. जमदाडे, नि. मा. पठारे, अंतोन भरपूर, गजानन पठारे विविध सामाजिक संघटनासह बौद्ध कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत