राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील पायल कलेक्शनच्या संचालिका वैशाली संतोष नहार यांना आयुष इंटरनॅशनल मेडिकल फाउंडेशन व राष्ट्रवादी...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील पायल कलेक्शनच्या संचालिका वैशाली संतोष नहार यांना आयुष इंटरनॅशनल मेडिकल फाउंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेल यांच्यावतीने छत्रपती संभाजी नगर येथे 'योग रत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजी नगर येथे पार पडलेले या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या औचित्य साधून योग साधकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी आयुष इंटरनॅशनल मेडिकल फाउंडेशनचे चेअरमन डॉ.सतीश कराळे, व्हा.चेअरमन नितीनराजे पाटील, सेक्रेटरी बाबुराव कानडे आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.
सौ.नहार या आपल्या व्यवसायाबरोबरच योग क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असल्याने त्यांच्या या कार्याची दखल घेऊन गौरविल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत