जिल्ह्यातील ११ नगरपरिषद व १ नगरपंचायत निवडणूकीसाठी प्रभाग रचना, सदस्य संख्या निश्चितीचे काम सुरू - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

जिल्ह्यातील ११ नगरपरिषद व १ नगरपंचायत निवडणूकीसाठी प्रभाग रचना, सदस्य संख्या निश्चितीचे काम सुरू

अहमदनगर(वेबटीम) जिल्ल्यातील ११ नगर परिषद व १ नगर पंचायत अशा एकूण १२ पालिकांची निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रभाग रचना व...

अहमदनगर(वेबटीम)



जिल्ल्यातील ११ नगर परिषद व १ नगर पंचायत अशा एकूण १२ पालिकांची निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रभाग रचना व सदस्य संख्या निश्चितीचे काम सुरू केले आहे.

जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार ८ नगरपरिषदांमधील सदस्य संख्या ३ ने, तर तीन नगरपरिषदांमधील सदस्य संख्या २ ने वाढणार आहे. एका नगरपंचायतीची सदस्य संख्या मात्र आहे तेवढीच म्हणजे १७ राहणार आहे. महापालिकेसह जिल्ह्यातील प्रलंबित असलेल्या १२ पालिकांच्या निवडणुकांसाठी पूर्वतयारी सुरू झाली आहे. त्यानुसार प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सन २०११ च्या लोकसंख्येनुसार महापालिकेची सदस्य संख्या व प्रभाग रचना आहे तेवढीच म्हणजे, सन २०१७ च्या निवडणुकी इतकीच राहणार असली, तरी नगरपरिषद व नगरपंचायतीच्या सदस्य संख्येत बदल झालेला आहे.

राज्य सरकारच्या सन २०२२ मधील अध्यादेशानुसार प्रभाग सदस्य संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यात 'अ' वर्ग नगरपरिषदांसाठी १ लाख लोकसंख्येसाठी ४० सदस्य संख्या व त्यानंतर प्रत्येकी ८ हजार लोकसंख्येसाठी आणखी १ सदस्य राहील. व वर्ग

नगरपरिषदांसाठी ४० हजार लोकसंख्येसाठी २५ सदस्य व त्यानंतर प्रत्येकी ५ हजार लोकसंख्येसाठी १ सदस्य, तसेच क वर्ग नगरपरिषदांच्या २५ हजार लोकसंख्येसाठी २० सदस्य संख्या निश्चित करण्यात आली आहे.

लोकसंख्या, प्रभाग व सदस्य संख्या प्रभाग रचना सुरू असलेल्या पालिकांची लोकसंख्या, प्रभाग व सदस्य संख्या पुढीलप्रमाणे

संगमनेरः लोकसंख्या ६५ हजार ८०४,प्रभाग २५, सदस्य ३०

राहाताः लोकसंख्या २२ हजार ३३५,प्रभाग १०, सदस्य २०

पाथर्डीः लोकसंख्या २७ हजार २११,प्रभाग २०, सदस्य २०

देवळाली प्रवराः लोकसंख्या ३० हजार ९९७,प्रभाग १०, सदस्य २१

शिर्डीः लोकसंख्या ३६ हजार ४,प्रभाग २१, सदस्य २३

राहुरीः लोकसंख्या ३८८१३,प्रभाग १२, सदस्य २४

जामखेडः लोकसंख्या ३९५५१प्रभाग १२, सदस्य २४

शेवगावः लोकसंख्या ३८ हजार ३७५,प्रभाग १२, सदस्य २४

श्रीगोंदा,लोकसंख्या ३१ हजार १३४,प्रभाग १२, सदस्य २२

श्रीरामपूरः लोकसंख्या ८९ हजार २८२,प्रभाग १७, सदस्य ३४

कोपरगाव लोकसंख्या ६९ हजार ५३७,प्रभाग १५, सदस्य ३०


प्रभाग रचनेचे सुधारित वेळापत्रक जाहीर

नगरविकास विभागाने यापूर्वी १२ जूनला प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार अहिल्यानगर महापालिका व जिल्ह्यातील नेवासा नगरपंचायतीसह

कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, राहता, शिर्डी, देवळाली प्रवरा, राहुरी, पाथर्डी, श्रीगोंदे, शेवगाव, जामखेड या नगरपालिकांची निवडणूक रखडलेली आहे. त्यांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यात आता बदल करण्यात आला आहे. त्याचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

असा आहे सुधारित कार्यक्रम

नगरपंचायत व नगरपालिकांची प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे १८ ऑगस्ट, प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती २१ ऑगस्टपर्यंत, प्राप्त हरकतींवर सुनावणी - २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबर, अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करणे-२६ ते ३० सप्टेंबर असा कार्यक्रम असणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत