राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीदिनी सात्रळ मध्ये शालेय साहित्य वाटप...!!! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीदिनी सात्रळ मध्ये शालेय साहित्य वाटप...!!!

  सात्रळ(वेबटीम)   लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या १५१ व्या जयंतीदिनी जि.प.प्राथ. केंद्र शाळा, सात्रळ मध्ये  लोकसेवा फाउंडेशन च्या वतीने, ...

 सात्रळ(वेबटीम)



  लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या १५१ व्या जयंतीदिनी जि.प.प्राथ. केंद्र शाळा, सात्रळ मध्ये  लोकसेवा फाउंडेशन च्या वतीने, शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, व शालेय साहित्याचे व खाऊचे वाटप करण्यात आले.

       २६ जून हा शाहू महाराजांचा वाढदिवस. हा वाढदिवस अस्पृश्य समाजाने सणाप्रमाणे साजरा करावा, असा ठराव बाबासाहेबांच्या प्रेरणेने माणगाव परिषदेने १९२० साली केला होता, बाबासाहेबांच्या 'मूकनायक' या पाक्षिकाला मुळ अर्थसाह्य हे शाहू राजांनीच केले होते, याची जाणीव धरून आपण समाजात काम केलं पाहिजे, असे मत शाहिर राजूभाऊ पलघडमल यांनी मांडले.

      शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात वेठबिगार निर्मूलन, हजेरी प्रथा बंदी, अस्पृश्यता निर्मूलन, महार वतन खालसा, स्त्री संरक्षण कायदे यांसारख सुधारणा; तसेच कायदे करून सामाजिक क्रांती घडवून आणली. या सर्व सुधारणांना डॉ. आंबेडकरांनी स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेमध्ये स्थान देऊन, राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक विचारांना राष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवले. बाबासाहेब कोलंबिया विद्यापीठातून पीएचडी ची पदवी घेऊन मायदेशी परतल्यावर शाहू राजांनी १९१६ साली हत्ती वरून साखर वाटली होती. म्हणून शाहू राजांचे योगदान आपण विसरता कामा नये, असे मत पंकज पलघडमल यांनी मांडले.

     यावेळी युवा नेते किरण कडू  व प्रवरा बँकेचे माजी संचालक रमेश पन्हाळे यांची कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती लाभली, तसेच या उपक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते व तालुक्याचे भूषण पंकज कडू पा. यांनी मार्गदर्शन केले.

     अभिवादनासाठी बाळासाहेब पलघडमल, कैलास पलघडमल, संदीप शेजवळ, संभाजी कडू पा, योगेश पलघडमल, मधुकर शेजवळ, ऋतिक पलघडमल व जि.प.प्राथ. केंद्र शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.एल.एम. खराडे मॅडम, शिक्षक दिलीप गायकवाड सर, सजन सर,नवगिरे सर हे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत