राहुरी(वेबटीम) राहुरी येथील न्यायालयात गुहा पाट येथे झालेल्या एसटी बस व विद्यार्थिनी यांच्यात अपघातातील एसटी बस चालक याची नुकतीच राहु...
राहुरी(वेबटीम)
राहुरी येथील न्यायालयात गुहा पाट येथे झालेल्या एसटी बस व विद्यार्थिनी यांच्यात अपघातातील एसटी बस चालक याची नुकतीच राहुरी येथील न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे .
याप्रकरणी सविस्तर हकीकत अशी आहे की दिनांक 14/3 /16 रोजी सकाळी साडेसात वाजता फिर्यादीची मुलगी गुहापाट चिंचोली येथे सायकलवर शाळेत गेली त्यावेळी गुहाफाट येथे नगर मनमाड रोडवर आरोपी यांनी सकाळी आठ वाजता आपल्या ताब्यातील बस नंबर 14 बी टी 38 30 ही हायगईने अविचाराने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवून फिर्यादीची मुलगी राहणार गुहा पाठ हिसजोरात धडक देऊन गंभीर जखमी करत सायकलच्या नुकसानीस कारणीभूत झाला म्हणून राहुरी पोलिसांनी आरोपी विरुद्ध नंबर 1 /100/16 अन्वये भारतीय दंड विधान 279 337 338 427 M .V . ऍक्ट १८४ प्रमाणे गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल झाल्यानंतर
पोलिसांनी सदर गुन्ह्याचा तपास करून दोषारोप पत्र मे .न्यायालयात पाठवून दिले सदर खटलेला एसएससी नंबर 778/16 असा नंबर पडला असा सदर खटला हा राहुरी येथील न्यायाधीश अनुपमा पारशेट्टी यांच्या समोर चालला सरकार तर्फे साक्षी पुरावा झाला व सबळ पुराव्या अभावी आरोपी नामे इम्रान रशीद खान पठाण याची दिनांक 24 / 6 /25 रोजी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आरोपीतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ व नोटरी पब्लिक अँड प्रकाश संसारे यांनी काम बघितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत