नेवासा (प्रतिनिधी) नेवासा तालुक्यातील करजगांव येथील सध्या नेवासा येथे रहिवासी असलेले गोपीनाथ माकोणे यांचा मुलगा गणेश गोपीनाथ माकोणे याने आप...
नेवासा (प्रतिनिधी)
नेवासा तालुक्यातील करजगांव येथील सध्या नेवासा येथे रहिवासी असलेले गोपीनाथ माकोणे यांचा मुलगा गणेश गोपीनाथ माकोणे याने आपल्या जिद्द आणि अभ्यासाच्या जोरावर एम.पी.एस.सी स्पर्धा परीक्षेत मोठे यश मिळवून मुळाथडी परीसरात मानाचा तुरा खोवला आहे. एम.पी.एस.सी. (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) मार्फत घेतलेल्या परीक्षेत यश मिळवून गणेश यांची गृह विभाग, एस.पी. कार्यालयात "डिस्ट्रिक्ट क्लर्क" या पदावर नियुक्ती झाली आहे.
या परीक्षेचे आयोजन डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस विभागांतर्गत करण्यात आले होते.
एप्रिल २०२५ मध्ये परीक्षेची प्रथम गुणवत्ता यादी जाहीर झाली होती आणि आज ११ जुलै २०२५ रोजी अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात
आली, ज्यामध्ये गणेश माकोणे याने आपले स्थान निश्चित केले. गणेश प्राथमिक शिक्षण करजगांव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे पुर्ण करुन,आपले पदवी शिक्षण एम.एस.सी फिजिक्स या विषयात फर्ग्युसन कॉलेज, पुणे येथून २०२३ मध्ये पूर्ण केले आहे. शिक्षणात सातत्याने गुणवत्ता राखणारा गणेश हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. गणेशच्या यशात त्यांच्या कुटुंबियांचा मोलाचा वाटा आहे. त्याची बहीण अपेक्षा माकोणे ही सिटी सर्वे ऑफिस, बीड येथे डाटा ऑपरेटर क्लर्क म्हणून कार्यरत आहे. आई गृहिणी असून वडील तहसील कार्यालय, नेवासा येथे दस्त लेखनिक म्हणून सेवा देत आहेत. गणेश माकोणे याच्या या यशाबद्दल गृह विभागाचे अवर सचिव संदिप ढाकणे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त संदिप मिटके, नगर प्रांतधिकारी सुधिर पाटील,शेवगांव उपविभागीय पोलिस उपाधीक्षक सुनिल पाटील, सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक दौलतराव जाधव, पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, नेवासा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, पत्रकार संघटनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब नवगिरे आदींनी अभिनंदन केले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत