राहुरी प्रतिनिधी राहुरी तालुक्यातील म्हैसगाव परिसरातील आग्रेवाडी येथील मुळा व्हॅली पब्लिक स्कूलमध्ये एका अनोख्या उपक्रमात वाढदिवस साजरा कर...
राहुरी प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील म्हैसगाव परिसरातील आग्रेवाडी येथील मुळा व्हॅली पब्लिक स्कूलमध्ये एका अनोख्या उपक्रमात वाढदिवस साजरा करण्यात आला. आपली मुलगी या शाळेत शिकते म्हणून प्रिया एज्युकेशन अँड ह्यूमन वेल्फेअर फाउंडेशनचे सीईओ अनिल डोलनर यांनी आपली मुलगी सुप्रिया डोलनर हिचा वाढदिवसाचा मोठा देखावा न करता, तो समाजोपयोगी कार्यातून साजरा करण्याचा आदर्श घालून दिला.
या वेळी शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये इयत्ता दहावीत प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. यासोबतच अनुप्रिया अनिल डोलनर हिच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. लहानपणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेमाची भावना रुजवावी, यासाठी हा छोटासा पण महत्त्वपूर्ण प्रयत्न केला गेला.
यानंतर अनिल डोलनर यांनी विद्यार्थ्यांना आईवडिलांप्रती प्रेम, वयानुसार होणारे शारीरिक-भावनिक बदल, आणि किशोरवयीन मुलामुलींमध्ये होणारी प्रेमप्रकरणे याविषयी अत्यंत समर्पक आणि प्रभावी मार्गदर्शनपर व्याख्यान दिले. याशिवाय विद्यार्थ्यांना आयुष्यभर उपयोगी पडेल अशी सामूहिक शपथही त्यांनी दिली.
वाढदिवस साजरा करताना खर्चिक कार्यक्रम वा पार्टी न करता विद्यार्थ्यांना नैतिक व सामाजिकदृष्ट्या योग्य मार्गदर्शन मिळावे, ही काळाची गरज असून अशा प्रकारचे उपक्रम हीच खरी गरज असल्याचे मत अनिल डोलनर यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी मुळा व्हॅली पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष माने सर, प्राचार्य म्हसे सर, रूपाली माने मॅडम, प्रियंका डोलनर मॅडम, दातीर सर, कुदनर सर तसेच संपूर्ण शिक्षकवृंद उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत