राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- नेहमी वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असलेल्या राहुरी फॅक्टरी येथिल डी पॉल इंग्रजी माध्यमातील शाळेतील इयत्ता दुसरीत शिक...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
नेहमी वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असलेल्या राहुरी फॅक्टरी येथिल डी पॉल इंग्रजी माध्यमातील शाळेतील इयत्ता दुसरीत शिक्षण घेणारी मुलगी शाळेच्या परिपाठानंतर एकटी शाळेतून थेट नगर - मनमाड महामार्गावर आल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विद्यार्थीनी शाळेतून बाहेर एकटी कशी गेली ,शिक्षकासह प्रशासनास याची कल्पना नसल्याची बाब समोर आली आहे.पालकांनी याबाबत जाब विचारला असता उलट तुमची मुलगी शाळेतच आलेली नाही असे म्हणून शालेय व्यवस्थापन जबाबदारी झटकून मोकळे झाले आहे.
राहुरी फॅक्टरी येथिल डी पॉल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता दुसरीत शिक्षण घेणारी विद्यार्थिनीला सोमवारी नेहमी प्रमाणे खासगी रिक्षातून शाळेत सोडण्यात आले.रिक्षा चालकाने मुलगी वर्गापर्यंत पोहचली की नाही याची खात्री झाल्यानंतर त्या ठिकाणाहून तो रिक्षा घेवून माघारी निघाला.परिपाठानंतर वर्गात दप्तर ठेवून
सदर विद्यार्थिनी शाळा बाहेर पडली. राहुरी फॅक्टरी - ताहराबाद या वर्दळीच्या रस्त्याने नगर मनमाड महामार्ग ओलांडून श्रीरामपूर रस्त्यापर्यंत येवून थांबली.या दोन्ही रस्त्यावरील वाहतूक पाहाता मोठ्या प्रमाणात असल्याने या मुलीचा सुदैवाने अपघात झाला नाही.
सदर मुलगी शाळे पासून एक ते दिड किलो मीटर अंतरावर पायी चालत येते.या दिड किलो मीटर अंतरावर जर मुलीचे अपहरण किंवा नको ती गोष्ट घडली असती तर त्याची जबाबदारी शाळेने घेतली असती का..? या घटनेमुळे राहुरी फॅक्टरीतील या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरनीवर आला आहे.
दरम्यान सदर मुलीच्या आजोबांना बोलावून नागरिकांनी त्या मुलीस ताब्यात दिले.सदर मुलीचे आजोबा व आजीने शाळेत जावून जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता.तुमची मुलगी शाळेतच आलेली नाही. असा घुमजाव शाळेच्या व्यवस्थापनाकडून करण्यात आला.त्यावेळी आजोबांनी प्राचार्य व शिक्षकांना जाब विचारत चांगलीच खरडपट्टी काढली आहे.
डिपॉल स्कुलबाबत अनेक तक्रारी असताना प्राचार्य नेहमी दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. विद्यार्थ्यांनी वेळेवर फी भरली नाही म्हणून परीक्षेला बसून न देणे याशिवाय किरकोळ गोष्टींरून विद्यार्थ्यास शिक्षा दिली जाते असे पालक वर्गातून बोलले जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत