श्रीरामपूर येथे भारतीय स्वाभिमानी संघाचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

श्रीरामपूर येथे भारतीय स्वाभिमानी संघाचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर

श्रीरामपूर(वेबटीम) येथील आगाशे सभागृह, टिळक वाचनालय, मेन रोड येथे रविवारी, (दि. २०) सकाळी ११.०० वा. ते सायं. ०५.००. वा. पर्यंत भारतीय कर्मचा...

श्रीरामपूर(वेबटीम)



येथील आगाशे सभागृह, टिळक वाचनालय, मेन रोड येथे रविवारी, (दि. २०) सकाळी ११.०० वा. ते सायं. ०५.००. वा. पर्यंत भारतीय कर्मचारी संघ आणि भारतीय स्वाभिमानी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष जिल्हास्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात येत आहे. या शिबिरात भारतीय कर्मचारी संघाचे राष्ट्रीय प्रचारक नानासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण होणार आहे. तर विद्रोही सांस्कृतिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक दिवे हे उद्घाटक असणार आहे.

महापुरुषांच्या आंदोलनामुळे बहुजन समाजाला हक्क अधिकार मिळाले. त्यातून विद्यार्थी, नोकरदार व नेता निर्माण झाले. महापुरुषांच्या नंतर मात्र मिळवलेले हक्क अधिकार सुरक्षित ठेवण्यात आपण अयशस्वी ठरलो. निश्चित उद्देश गाठण्यासाठी निश्चित कार्यक्रम, सांघिक प्रयत्न व इमानदार नेतृत्व असेल तरच यशस्वी होऊ शकतो. या बाबतीत समाजात जागृती करणे व समाजाला संघटीत करण्यासाठी वरील प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली. तरी या प्रशिक्षण शिबिरास बहुजन समाजातील सर्वांनी तन, मन व धन देऊन सहकार्य करावे आणि सामाजिक परिवर्तनाच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा भाग व्हावे, असे आवाहन भारतीय कर्मचारी संघ, भारतीय स्वाभिमानी संघ, युनायटेड मुस्लिम फोरम, महामानव विचार प्रबोधन समिती, बहुजन समन्वय समिती आदींच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत