नेवासा तालुक्यात रस्ता लुट करणारी टोळी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

नेवासा तालुक्यात रस्ता लुट करणारी टोळी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई

अहिल्यानगर(वेबटीम) अहिल्यानगर एलसीबीने रस्ता लूट करणारी टोळी नेवावा तालुक्यात जेरबंद केली आहे. एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्...

अहिल्यानगर(वेबटीम)



अहिल्यानगर एलसीबीने रस्ता लूट करणारी टोळी नेवावा तालुक्यात जेरबंद केली आहे. एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली आहे.

धर्मनाथ टिकाराम जोहरे वय ४३ वर्षे, व्यवसाय खाजगी नोकरी, रा. गारखेडा परिसर, ता. जि. छ. संभाजीनगर हे दिनांक १७/०७/२०२५ रोजी रात्री ०९.०० वा. चे सुमारास नेवासा फाटा छ. संभाजीनगर येथे जाण्यासाठी गाडीची वाट पाहत असतांना त्यांना एका स्विफ्ट कार चालकाने छ. संभाजीनगर येथे सोडतो असे म्हणुन कार मध्ये बसवुन घेवून जावुन फिर्यादीस कारमध्ये चाकूचा धाक दाखवुन व मारहाण करुन रोख रक्कम, लॅपटॉप, मोबाईल फोन, घड्याळ काढून घेवुन फिर्यादीस उतरवून दिले होते. सदर घटनेबाबत नेवासा पोलीस स्टेशन गु.र.नं. ६८२/२०२५ बीएनएस कलम ३०९ (४), १४० (१) (२) प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल झालेला होता,

मा. श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधिक्षक अहिल्यानगर यांनी पोनि/श्री. किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांना सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून, गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेशीत केले होते.

नमूद आदेशा प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोउपनि राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार सुरेश माळी, फुरकान शेख, सोमनाथ झांबरे, संदीप दरंदले, प्रमोद जाधव, किशोर शिरसाठ, भाऊसाहेब काळे, उमाकांत गावडे, महादेव भांड यांचे पथक तयार करुन पथकास गुन्ह्यातील आरोपीची माहिती व शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केले.

पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी घटनाठिकाणी भेट देवून फिर्यादीकडून आरोपीचे वर्णन प्राप्त करुन तसेच घटनाठिकाणचे आजुबाजुचे रोडचे सी. सी. टी. व्ही. फुटेज चेक करुन आरोपीबाबत माहिती संकलित केली. सदर आरोपीची वर्णन तसेच तांत्रिक विश्लेषणाचे आधारे सदरचा गुन्हा हा महेश शिरसाठ रा. म्हसले, ता. नेवासा व त्याचे एका साथीदाराने केला असल्याची माहिती प्राप्त झाली. सदर आरोपोंची माहिती काढत असतांना सदर आरोपी हे त्यांचेकडील गुन्ह्यात वापरलेल्या कारने भेंडा येथुन नेवासा फाटा कडे येणार असल्याची माहिती मिळालो. पथकाने सदर माहिती आधारे नागापुर फाटा कमानीजवळ सापळा रचून थांबले असता बातमीतील कार नेवासा फाटा कडे येतांना दिसली. पोलीस पथकाने सदरची कार अडवुन महेश आबासाहेव शिरसाठ वय २६ वर्षे, रा. म्हसले, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर, गौरव शहादेव शिरसाठ वय २५ वर्षे, रा. सदर असे असल्याचे सांगितले, त्यांचेकडे वर नमुद गुन्ह्याबाबत त्यांना विश्वासात घेवून विचारपूस करता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

आरोपीचे ताब्यातुन व कारचे झडतीमध्ये गुन्ह्यातील चोरीस गेले मालापैकी लॅपटॉप, मोबाईल फोन, रोख रक्कम, गुन्ह्याचे वेळी वापरलेली कार, मोबाईल, चाकु असा एकुण ६,००,५००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदर आरोपींना विश्वासात घेवुन त्यांचेकडे आणखी इतर काही गुन्हे केले आहेत काय याबाबत सखोल व बारकाईने विचारपुस करता त्यांचेकडुन नेवासा पोलीस ठाणे गु.र.नं. ६९६/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (६), ३(५) प्रमाणे गुन्हा उघडकीस आला आहे.

ताब्यातील आरोपींना गुन्ह्याचे तपासकामी नेवासा पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्हयाचा पुढील तपास नेवासा पोलीस स्टेशन हे करीत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत