राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरीतील किरण चव्हाण याच्या मालकीचा असलेला विवो कंपनीचा मोबाईल बुधवार दि.३० जुलै रोजी सायंकाळच्या दरम्यान ...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरीतील किरण चव्हाण याच्या मालकीचा असलेला विवो कंपनीचा मोबाईल बुधवार दि.३० जुलै रोजी सायंकाळच्या दरम्यान येथील क्लब हाऊस प्रांगणातून चोरी गेल्याची घटना घडली आहे.
राहुरी फॅक्टरी येथील किरण चव्हाण व त्यांचे काही मित्र हे क्रिकेट खेळत असताना मोबाईल नसल्याचे त्याच्या लक्षात आले.मोबाईलची शोधाशोध केली असता तो बंद मिळून आला.
याप्रकरणी किरण चव्हाण यांनी राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.
तरी कोणास विवो कंपनीचा मोबाइल मिळून आल्यास त्वरीत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत