देवळाली प्रवरा(वेबटीम) श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आ.हेमंत ओगले यांच्या स्थानिक निधीतून उद्या शनिवार २ ऑगस्ट रोजी सकाळी ९ त...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आ.हेमंत ओगले यांच्या स्थानिक निधीतून उद्या शनिवार २ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते १० यावेळेत देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीत ४० लक्ष रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन व त्यानंतर आ.हेमंत ओगले यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न होणार आहे.
यावेळी देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्र.१ मध्ये देवळाली दवणगाव रस्ता इनामदार वस्तीपर्यंत रस्ता खडीकरण करणे, प्रभाग क्र. ९ मध्ये कारखाना टाकळी रस्ता ते संजय भास्कर कदम वस्तीपर्यंत्त रस्ता खडीकरण करणे, देवळाली प्रवरा नगर परिषद अंतर्गत हायमॅक्स बसविणे, प्रभाग क्र. २मध्ये अर्जुन तुकाराम मुसमाडे यांच्या वस्तीजवळ हायमॅक्स बसविणे, प्रभाग क्र. ४ मध्ये कुंभार गल्ली, संजय पाटील यांचे घराजवळील चौकात हायमॅक्स बसविणे, प्रभाग क्र. ३ मधील देवळाली-शेटेवाडी रोडपासून भागवत खांदे बस्ती पर्यंतचा रस्ता खडीकरण करणे आदी विकास कामांचा लोकार्पण सोहळा व त्यानंतर शहरातील बाजार तळावरील सर्कलजवळ असलेल्या आराध्या कॉम्प्लेक्स येथे आ.हेमंत ओगले यांच्या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे.
माजीमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.हेमंत ओगले हे असणार आहे.तर जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे.
यावेळी सचिन गुजर,ज्ञानेश्वर मुरकुटे,बाबासाहेब दिघे, सुधीर नवले रावसाहेब खेवरे ,कृष्णा मुसमाडे, नानासाहेब पठारे,बाळासाहेब आढाव,बाळासाहेब खांदे,नानासाहेब कदम,बाळासाहेब खुरुद, भागवत मुंगसे,दत्ता कडू,वैभव गिरमे,राजेंद्र मुंजाबा कदम,शिवाजी काका मुसमाडे,अण्णासाहेब चोथे,अनंत कदम ,गोवर्धन शेटे,कारभारी वाळुंज,अॅड. प्रकाश संसारे,आदिनाथ कराळे,डॉ. विश्वास पाटिल,सचिन म्हसे,कुणाल पाटिल ,प्रदिप गरड ,वसंत ता. कदमउत्तमराव कडू, कारभारी होले, सचिन बाळासाहेब चव्हाण, तैनूर भाई पठाण डॉ. फिरोज शेख, भगवान गडाख,भाऊसाहेब गुंजाळ मयुर आडागळे आदिंसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन देवळाली प्रवरा शहर काँग्रेस कमिटी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार). महाविकास आघाडी व मित्र पक्ष, देवळाली प्रवरा यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत