राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथील श्रीकृष्ण इंडस्ट्रीजचे चेअरमन महेंद्र हापसे यांना महाराष्ट्र बिझनेस अवार्ड -२०२५ जाहीर करण...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथील श्रीकृष्ण इंडस्ट्रीजचे चेअरमन महेंद्र हापसे यांना महाराष्ट्र बिझनेस अवार्ड -२०२५ जाहीर करण्यात आला आहे.
उद्योजक महेंद्र हापसे यांनी श्री कृष्ण इंडस्ट्रीजच्या माध्यमातून साउंड, ट्रस व इतर त्या अनुषंगाने व्यवसायात राज्यभरात चांगला नावलौकिक मिळविला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन उद्योगांना चालना मिळण्यासाठी भांडवल उभा करून देणारा, असा हा ७० हजाराहून अधिक उद्योजकांचा समूह म्हणून ओळखला जाणारा, "महाराष्ट्राचा महामंच असलेला रिसिल डॉट इन" चा महाराष्ट्र बिज़नेस अवार्ड हा प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
१ ऑगस्ट रोजी नाशिक येथे महाराष्ट्रातील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी, प्रशासनातील अधिकारी व रिसीलचे संस्थापक यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
या पुरस्काराबद्दल ह.भ.प विकासानंद महाराज मिसाळ, ब्राम्हणी ग्रामपंचायत , सोसायटी पदाधिकारी व ग्रामस्थ तसेच झी टॉकीज परिवार व सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रातील मंडळींनी अभिनंदन केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत