राहुरी फॅक्टरीतील आदिनाथ वसाहत मध्ये श्रावण मासानिमित्त शिवलिलामृत पारायणाला सुरुवात तसेच विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा जिर्णोद्धराचा भूमिपूजन समारंभ संपन्न - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीतील आदिनाथ वसाहत मध्ये श्रावण मासानिमित्त शिवलिलामृत पारायणाला सुरुवात तसेच विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा जिर्णोद्धराचा भूमिपूजन समारंभ संपन्न

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील आदिनाथ वसाहत येथील महादेव मंदिर येथे श्रावण मासानिमित्ताने शिवलिलामृत पारायणास सुरुवात झाली असू...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

राहुरी फॅक्टरी येथील आदिनाथ वसाहत येथील महादेव मंदिर येथे श्रावण मासानिमित्ताने शिवलिलामृत पारायणास सुरुवात झाली असून परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने या पारायण सोहळ्यात सहभागी झाले आहेत.

दरवर्षी श्रावण मासानिमित्ताने आदिनाथ वसाहत येथील महादेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात यावर्षी देखील श्रावण मासानिमित्ताने शिवलिलामृत पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

त्याचबरोबर येथील असलेले जुने विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा जीर्णोद्धार भूमिपूजन देखील या ठिकाणी संपन्न झाला आहे.

तरी परिसरातील दानशूर मंडळींनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर जीर्णोद्धारासाठी देणगी स्वरूपात मदत करावी असे आवाहन आदिनाथ वसाहत मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत