श्रीगोंदा(गणेश कांबळे) महिन्याला जास्त परतावा देण्याचे आमिष देत श्रीगोंदा तालुक्यातील हजारो लोकांची शेकडो कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक करणा...
श्रीगोंदा(गणेश कांबळे)
महिन्याला जास्त परतावा देण्याचे आमिष देत श्रीगोंदा तालुक्यातील हजारो लोकांची शेकडो कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या सिसपे, इन्फिनिटी बिकॉन, झेस्ट, आय बि ग्लोबल, एएमसी अश्या कंपण्यांवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी आज श्रीगोंदा-नगर तालुक्याचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी थेट जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेत त्यांच्याशी या फसवणूक प्रकरणी सविस्तर चर्चा करत दोषींवर कठोर कारवाई करत गोर गरीब लोकांचे या कंपनीकडे अडकलेले पैसे लवकरात लवकर मिळण्याच्या दृष्टीने पोलिसांनी जलद गतीने तपास करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे
सदर कंपनीत गुंतवणूक केलेल्या लोकांची संख्या श्रीगोंदा तालुक्यात खूप मोठी आहे श्रीगोंदा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन सुद्धा तपासात कुठलीच प्रगती होत नसल्याचे दिसत आहे एकूणच श्रीगोंदा पोलिसांच्या तपास पद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यामुळे आमदार पाचपुते यांनी आज थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठत पोलीस अधीक्षक घार्गे यांची भेट घेत या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याबाबत लेखी पत्र दिले या पत्रात त्यांनी म्हंटले आहे की आपण स्वतः या प्रश्नावर विधिमंडळात आवाज उठवलेला असून या प्रकरणाचे गांभीर्य शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे तसेच सदर कंपनीच्या संचालकांकडून गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळतील असा खोटा विश्वास दिला जात आहे त्याबाबत सदर संचालक हे ऑडिओ व्हिडिओ क्लिप प्रसारित करून अजूनही नागरिकांचे दिशाभूल करत आहेत प्रयत्न करूनही गुंतवणूकदारांचे पैसे मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून दोषींवर कारवाईची करण्याची मागणी आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी अधिक्षक घार्गे यांच्याकडे केली आहे
त्यामुळे आता खुद्द आमदारांनीच पोलीस अधीक्षकांना लेखी पत्र दिल्यामुळे थंडावलेल्या पोलीस तपासाला आतातरी गतीमिळणार का आणि गोरगरीब लोकांना पैसे परत मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत