श्रीरामपूर जिल्हा आणि देवळाली तालुका होण्यासाठी 15 ऑगस्ट पूर्वसंध्येला सर्व पक्षीय घंटानाद आंदोलन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

श्रीरामपूर जिल्हा आणि देवळाली तालुका होण्यासाठी 15 ऑगस्ट पूर्वसंध्येला सर्व पक्षीय घंटानाद आंदोलन

राहुरी (प्रतिनिधी)  मध्यंतरी ऐरणीवर आलेला जिल्हा विभाजन ज्वलंत सामाजिक प्रश्न जिल्ह्याचे अहिल्यानगर नामांतराने प्रलंबित राहिला. शासनाने किमा...

राहुरी (प्रतिनिधी)

 मध्यंतरी ऐरणीवर आलेला जिल्हा विभाजन ज्वलंत सामाजिक प्रश्न जिल्ह्याचे अहिल्यानगर नामांतराने प्रलंबित राहिला. शासनाने किमान संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली 750 व्या जन्मोस्तव वर्ष निमित्ताने श्रीरामपूर जिल्हा आणि देवळाली- श्रीशिवाजीनगर तालुका निर्मितीला प्राधान्य द्यावे.यासाठी शासनाला जिल्हा विभाजनाची आठवण रहावी, यासाठी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आज गुरुवारी सायंकाळी 6.00 वाजता देवळाली-प्रवरा येथील श्रीराम मंदिरात साकडे घालून घंटानाद आंदोलन होणार आहे. या आंदोलनात सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक संघटनानी  लोकसहभाग नोंदवावा असे आवाहन श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी केले आहे.

प्रसिद्धी पत्रकात राजेंद्र लांडगे म्हणाले, शासन दरबारी निकष आधारे आणि सर्वात कमी खर्च येणारा श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी अनेक वर्षांपासून जनआंदोलने चालू आहे. सातत्यपूर्वक राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्र पवार उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार विधान परिषद सभापती राम शिंदे माजी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील चंद्रकांतदादा पाटील बाळासाहेब थोरात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचेसह सर्वच आजीमाजी लोकप्रतिनिधींना अनेकदा समक्ष भेटून निवेदने देण्यात आली आहे.

भौगोलिकदृष्ट्या क्षेत्रफळाने गोवा राज्या पेक्षा पाच आणि दिल्ली राज्यापेक्षा अकरा पट  मोठा असलेला अहिल्यानगर जिल्ह्याचे विभाजन करण्याची हिच योग्य वेळ आहे. गतिमान आणि धाडसी फडणवीस- शिंदे- पवार सरकारला 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी श्रीरामपूर जिल्हा आणि देवळाली- श्रीशिवाजीनगर तालुका करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्याची आठवण राहावी म्हणून प्रभू श्रीरामालाच साकडे घालून घंटनाद आंदोलन करत आहोत.

तसेच जिल्ह्यासाठी बहुतांशी कार्यालये शहरात कार्यान्वित असल्याने श्रीरामपूर जिल्हा होणं सर्वांचे हितावह राहिल.

तसेच श्रीरामपूर जिल्हा आणि देवळाली- श्रीशिवाजीनगर तालुका झाल्यास गेलेलं वैभव पुन्हा प्राप्त होण्यास मदत होणार आहे.यामुळे नवनवीन उद्योगधंदे सुरू हॊतील. त्यातून रोजगाराच्या संधी प्राप्तीनंतर सर्व सामान्यांच्या क्रय शक्तीत देखील वाढ होईल. देवळाली- प्रवरा येथे प्रत्यक्षात नगरपालिका स्थापन झालेली आहे. श्रीरामपूर जिल्हा आणि देवळाली- श्रीशिवाजीनगर तालुका निर्मिती झाल्यास राहुरी तालुक्यातील श्रीरामपूर विधानसभेला जोडलेल्या दुर्लक्षित 32 गावांना सुद्धा देखील न्याय मिळेल. एकंदरीत श्रीरामपूर जिल्हासह देवळाली- श्रीशिवाजीनगर तालुका होण्यासाठी सरकारला जाग यावी म्हणून 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आज गुरुवारी सायंकाळी 6.00 वाजता देवळाली-प्रवरा येथील श्रीराम मंदिरात साकडे घालून घंटानाद आंदोलनात सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक संघटनांनी लोकसहभाग नोंदवावा असे आवाहन राजेंद्र लांडगे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत