राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील साई आदर्श मल्टिस्टेटने १७५ कोटी रुपये ठेवींचा टप्पा पूर्ण केला असून संस्थेचे संस्थापक चेअरमन शिव...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील साई आदर्श मल्टिस्टेटने १७५ कोटी रुपये ठेवींचा टप्पा पूर्ण केला असून संस्थेचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी ठेवीदार, सभासद व हितचिंतकांच्या सहकार्यामुळे हे हा यशस्वी टप्पा पूर्ण केल्याचे म्हंटले आहे.
'आव्वाज जनतेचा' शी बोलताना शिवाजीराव कपाळे यांनी म्हंटले की, साई आदर्श मल्टीस्टेट १७५ कोटींचे लक्ष पूर्ण करुन अविरत अर्थप्रवास करत आहे.. हा शतकोत्तर प्रवास खऱ्या अर्थाने साईबाबांचे आशिर्वाद आणि सभासद, ठेवीदार व हितचिंतक यांनी ठेवलेल्या विश्वासामुळे समृद्ध झाला आहे.
साई आदर्श संस्थेच्या ठेवी वाढल्या, शाखा वाढल्या, खातेदार वाढलेत तसेच अधिकाधिक पारदर्शी, स्वच्छ अर्थसेवा द्यायची आमची जबाबदारीही नक्कीच वाढली आहे.
साई आदर्शच्या प्रवासात आपण दिलेली साथ.. विश्वास.. प्रेम.. पाठबळ यांचे आभार शब्दात व्यक्त होणार नाही. येत्या काळात आणखी प्रवास अजुन खुप करायचा असून यासाठी सर्व सोबत असतील आणि आम्ही आपल्या निरंतर राहू असा विश्वास कपाळे यांनी व्यक्त केला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत