राहाता(वेबटीम) साई आदर्श मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड शाखेचे राहाता तालुक्यातील दाढ येथे नवीन सुसज्ज जागी स्थलांतर उद...
राहाता(वेबटीम)
साई आदर्श मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड शाखेचे राहाता तालुक्यातील दाढ येथे नवीन सुसज्ज जागी स्थलांतर उद्या गुरुवार दि. ७ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता वरद विनायक धाम लोणीचे महंत उद्धवजी महाराज मंडलिक यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती साई आदर्श मल्टीस्टेट चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी दिली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील राहणार आहेत. यावेळी दाढ बुद्रुकचे सरपंच तात्यासाहेब सातपुते , विखे कारखान्याचे संचालक सुनील तांबे, गोरक्षनाथ तांबे, योगेश तांबे, उपसरपंच नकुल तांबे, भानुदास तांबे, भाऊसाहेब पाळंदे , भगवान झनान,अशोकराव गाडेकर, विजय तांबे, संजय गाडेकर, पांडुरंग बनसोडे आदिंसह मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित रहावे असे आवाहन साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत