राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज श्री शिवाजीनगर येथे आज गुरुवार ७ ऑगस्ट पासून कला ...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज श्री शिवाजीनगर येथे आज गुरुवार ७ ऑगस्ट पासून कला व शास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण सुरू होऊन विद्यार्थ्यांनी आजपासून महाविद्यालयात प्रवेश केला असता विद्यालयाच्या प्रा.संगीता गणेश भांड गायकवाड यांच्या वतीने विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे मिळावे यासाठी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी स्वामी विवेकानंदांची बोधवचने हे पुस्तके भेट देऊन विद्यार्थ्यांचे महाविद्यालयात स्वागत करण्यात आले आहे.
कला व शास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थी व विद्यार्थ्यांना या पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
यावेळी संस्थेचे प्राचार्य उत्तम खुळे सर यांच्यासह शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत