(राहुरी : श्रेयस लोळगे) राहुरी शहरातील जंगम गल्ली येथील रहिवासी कै. विलास किसन जंगम (आगलावे) यांचे आज रविवार, दि. ३१ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळ...
(राहुरी : श्रेयस लोळगे)
राहुरी शहरातील जंगम गल्ली येथील रहिवासी कै. विलास किसन जंगम (आगलावे) यांचे आज रविवार, दि. ३१ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ८ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते ८० वर्षांचे होते.
सर्वांना "अण्णा" या नावाने परिचित असलेले विलास जंगम हे अत्यंत मनमिळावू, प्रेमळ स्वभावाचे आणि सर्वांशी आपुलकीने वागणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी सामाजिक व धार्मिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. ते महादेवाचे निस्सीम भक्त होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, नातवंडे, भाऊ, भावजय असा परिवार आहे. विद्यामंदिर शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी महेश जंगम यांचे ते वडील होते.
अंत्यविधी सोमवार, दि. १ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.३० वा. राहुरी शहरातील गणपती घाट येथे होणार आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. 🕉️

कोणत्याही टिप्पण्या नाहीत