श्रीरामपूर(वेबटीम) श्रीरामपूर शहरात काल दोन आरोपींमध्ये वाद होऊन त्यांनी शहरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला होता. त्याचप्रमाणे हातामध्ये देश...
श्रीरामपूर(वेबटीम)
श्रीरामपूर शहरात काल दोन आरोपींमध्ये वाद होऊन त्यांनी शहरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला होता. त्याचप्रमाणे हातामध्ये देशी कट्टा घेऊन एकमेकांच्या पाठलाग करतानाचा व्हिडिओ सीसीटीव्ही च्या माध्यमातून पोलिसांना मिळून आला होता.
त्या अनुषंगाने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे खुनाच्या प्रयत्नाचा अर्थात BNS कलम 109 खाली गुन्हा नोंद करण्यात आला होता. यातील आरोपीचा पोलिसांची दोन पथके कालपासून कसुन शोध घेत होते.आरोपी हा फरार झालेला होता.
काल सायंकाळी यातील आरोपीला नेवासा येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिलेली असून त्यास या गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली आहे.
त्यातील आरोपीचे नाव हुजेब अनिस शेख (वय वर्ष 21 ) असे असून राहणार श्रीरामपूर आहे.सदरची कारवाई पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे व अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपाधिक्षक जयदत भवर , पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने केली.
सदरच्या गुन्ह्यामागे नेमके कारण काय? आरोपीने गुन्ह्यात वापरलेला देशी कट्टा नेमका कुठून खरेदी केला?याबाबत पुढील तपास सुरू असल्याचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत