माजी उपनगराध्यक्ष सुखदेव मुसमाडे यांच्या जीवन कार्यावर आधारित "बिकट वाट, सुखाची पहाट" पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

माजी उपनगराध्यक्ष सुखदेव मुसमाडे यांच्या जीवन कार्यावर आधारित "बिकट वाट, सुखाची पहाट" पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते

  देवळाली प्रवरा(वेबटीम) आज अहिल्यानगर येथे  देशाचे माजी कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या हस्ते देवळाली प्रवराच...

 देवळाली प्रवरा(वेबटीम)


आज अहिल्यानगर येथे  देशाचे माजी कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या हस्ते देवळाली प्रवराचे माजी उपनगराध्यक्ष सुखदेव मुसमाडे यांच्या जीवन कार्यावर आधारित "बिकट वाट, सुखाची पहाट एका कृषी पुत्राची जीवन वाटचाल" या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकाचे लेखक पत्रकार संजय हुडे असून, ज्येष्ठ पत्रकार सुधाकर कराळे यांनी सहाय्य केले आहे.




पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात अनेक प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश होता. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे, माजी आमदार सुधीर तांबे,  अंकुशराव काकडे, माजी आ.भानुदास मुरकुटे, तसेच श्री. अरुण पा. कडू, तसेच विजया मुसमाडे, जयेश मुसमाडे, प्रशांत मुसमाडे आदी उपस्थित होते.


 सुखदेव मुसमाडे यांच्या  वयाच्या ७१ वीनिमित्ताने पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सुखदेव मुसमाडे यांच्या जीवन कार्याचा गौरव केला. 



सुखदेव मुसमाडे हे शेतकरी कुटुंबात जन्मलेले आणि त्यांचे जीवनप्रवास फारच प्रेरणादायक आहे. त्यांनी शेती क्षेत्रात केलेल्या नाविन्यपूर्ण प्रयोगांमुळे आपल्या भागातील शेतकऱ्यांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे. त्याचप्रमाणे, त्यांनी उद्योग क्षेत्रातही आपला ठसा उमठवला. सुखदेव मुसमाडे यांचा सामाजिक कार्यातील सहभाग देखील उल्लेखनीय आहे.


शेतकऱ्यांसाठी अनेक योजना तयार करणे, कृषी व्यवसायात प्रगती साधणे आणि विविध शेतकरी संघटनांमध्ये सहभाग हे त्यांचे प्रमुख कार्य होते. तसेच, त्यांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून आपल्या समाजात मोठे योगदान दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत