राहुरी फॅक्टरी(वेबटीम ) मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांसाठी राहुरी तालुक्याच्या ...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांसाठी राहुरी तालुक्याच्या वतीने 1000 भाकरी/चपात्या जमा करण्याची विशेष व्यवस्था केली आहे.
सकल मराठा समाज, राहुरी तालुका यांचा हा उपक्रम मुंबईतील आंदोलनात उपस्थित असलेल्या मराठा बांधवांच्या जेवणाची सोय सुनिश्चित करण्यासाठी असलेला आहे. भाकरी/चपात्या गोळा करण्यासाठी नागरिकांना दोन ठिकाणी उपस्थित होण्याचे आवाहन करण्यात आले आहे:
वैष्णवी चौक, राहुरी फॅक्टरी
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, राहुरी फॅक्टरी
देवळाली प्रवरा बाजारतळ
सकाळी 9 वाजता या दोन्ही ठिकाणी नागरिकांनी एकत्र येऊन भाकरी/चपात्या जमा कराव्यात.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत