तांदुळवाडी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब पेरणे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

तांदुळवाडी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब पेरणे

राहुरी (श्रेयस लोळगे ) तांदुळवाडी येथील तंटामुक्त गाव अभियान समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ बाळासाहेब रावसाहेब पेरणे यांची निवड करण्यात आली.  ...

राहुरी (श्रेयस लोळगे )



तांदुळवाडी येथील तंटामुक्त गाव अभियान समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ बाळासाहेब रावसाहेब पेरणे यांची निवड करण्यात आली. 

      सरपंच विराज धसाळ यांच्या उपस्थितीत व माजी सरपंच मच्छिंद्र पेरणे यांच्या अध्यक्षतेखाली तांदुळवाडी ग्रामपंचायतची ग्रामसभा तुळजा भवानी मंदिर येथे संपन्न झाली यावेळी बाळासाहेब पेरणे यांची एकमताने अध्यक्षपदी निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष भास्कर काशिनाथ पेरणे यांनी राजीनामा दिल्याने नवीन अध्यक्ष निवड करण्यात आली. त्यांच्या नावाची सूचना डॉ.तनपुरे कृषी व फलोत्पादन सहकारी संस्थेचे माजी व्हा.चेअरमन गोरक्षनाथ खडके यांनी मांडली त्यास पत्रकार विनीत धसाळ यांनी अनुमोदन दिले. बाळासाहेब पेरणे यांनी यापूर्वी तंटामुक्त समिती अध्यक्ष पदासह सेवा संस्थेचे चेअरमन, उपसरपंच, तुळजाभवानी दूध संस्थेचे चेअरमन, तुळजाभवानी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष, मुळा नदी परिसर समस्या निवारण समितीचे सचिव आदी पदावर काम केलेले आहे. पेरणे यांचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अनेकांनी अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत