देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा येथील नाभिक संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली अध्यक्षपदी सतिष हुडे तर उपाध्यक्षपदी सागर स...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
देवळाली प्रवरा येथील नाभिक संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली अध्यक्षपदी सतिष हुडे तर उपाध्यक्षपदी सागर सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे.
देवळाली प्रवरात नाभिक समाज बांधवांच्यावतीने संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम पार पडला. यावेळी संत सेना महाराजांच्या मूर्तीस अभिषेक व विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर प्रसाद वाटप कार्यक्रम पार पडला.
याप्रसंगी देवळाली प्रवरा येथील नाभिक संघटनेचे कार्यकारणी स्थापन करण्यात आली. अध्यक्षपदी सतीश सुखदेव हुडे, उपाध्यक्षपदी सागर संजय सोनवणे, खजिदारपदी गणेश पुंडलिक हुडे तसेच सचिव पदी पत्रकार पप्पू बाबुराव चित्ते यांची निवड करण्यात आली.
यावेळी नवीन कार्यकारणीचा सत्कार मावळते अध्यक्ष रमेश हुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी नाभिक संघटनेचे ज्येष्ठ सदस्य सुखदेव हुडे, पुंडलिक हुडे, आबा सोनवणे, भीमराज सोनवणे, अरुण बाबुराव हुडे, राजू सोनवणे, अनिल हुडे, दिनेश भाग्यवंत, गणेश सोनवणे ज्ञानेश्वर वारुळे, गौरव हुडे दिनेश सोनवणे, ओंकार हुडे, ओंकार हुडे , किरण हुडे तसेच नाभिक संघटनेचे कार्यकर्ते व माता भगिनी उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत