पानेगांव (वार्ताहर) शासन स्तरावरील विविध योजना ग्रामपंचायत पानेगांव येथे राबविण्यात येणार असल्याचे नेवासा पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकार...
पानेगांव (वार्ताहर)
शासन स्तरावरील विविध योजना ग्रामपंचायत पानेगांव येथे राबविण्यात येणार असल्याचे नेवासा पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब कासार यांनी आपल्या अध्यक्षस्थानावरुन बोलताना सांगितले .
मागील महिन्यात नेवासा गटविकास अधिकारी डॉ संजय लखवाल यांनी पानेगांव ग्रामपंचायत भेट देवून पुर्ण माहिती घेतली असुन शासन स्तरावरील योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी त्यांनी पानेगावची निवड करण्यात येईल यासाठी परिपूर्ण तसेच एकसंघ तसेच योजना राबविण्यासाठी असणारा ग्रामस्थांचा एकोपा हे सर्वच येथे उपलब्ध असून या निमित्ताने वरिष्ठांन कडे पानेगांव ग्रामपंचायत अहवाल सादर करण्यात येईल त्याच बरोबर कर वसुली अल्पवयीन लग्न, प्लास्टिक बंदी माझी वसुंधरा स्वच्छता अभियान या बाबत मार्गदर्शन कासार यांनी केले.
पशुवैद्यकीय अधिकारी डॉ शिंदे यांनी लंपी आजारा बाबत माहिती देवून कसा पद्धतीने काळजी घ्यायची तसेच काही अडचणी आल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे डॉ शिंदे यांनी सांगितले. विविध विषयांवर चर्चा होवून तातडीने ठराव मंजूर करण्यात आले .लोकनियुक्त सरपंच सौ निकीता भोसले आंबेकर उपसरपंच सुरेश जंगले यांचा मागदर्शनाखाली ग्रामसभेच आयोजन करण्यात आले.यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. ग्रामसभेसाठी मुळाचे संचालक रंगनाथ जंगले, सुभाष गुडधे, रमेश जंगले रमेश गुडधे संकेत गुडधे, तंटामुक्ती अध्यक्ष उद्धव चिंधे,ज्ञानेश्वर जंगले शिवाजी शेंडगे भाऊसाहेब वाघमारे पोपटराव जंगले, बाळासाहेब जंगले दादासाहेब तनपुरे,माजी उपसरपंच डॉ जयवंत गुडधे, पोपटराव संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर जंगले,पानेगांव संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव जंगले, राजेंद्र जंगले, रविंद्र सोनवणे,बाबासाहेब गुडधे, दिपक जंगले, विशाल जंगले,
सोनई प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक राजेंद्र पाटोळे ,जनार्दन दिवटे,आशा सेविका विमल वाघमारे, रंजना वाघमारे, गणेश गायकवाड, सुनिल चिंधे, नारायण जंगले, बाबासाहेब शेंडगे, शुभम जंगले, आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रास्तविक ग्रामविकास अधिकारी गणेश पाखरे यांनी केले आभार गणेश गायकवाड यांनी मानले.
नव्याने पानेगांव ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सुरेश जंगले यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव सुभाष गुडधे यांनी मांडला त्याच ज्ञानेश्वर जंगले यांनी अनुमोदन दिले.यावेळी उपसरपंच जंगले यांनी सांगितले की, ग्रामस्थांनी जो विश्वास टाकला लोकनेते सुनिलभाऊ गडाख पाटील मुळाचे संचालक संजय पाटील जंगले यांचा मागदर्शनाखाली शासनाच्या विविध योजनां गावात राबविण्यात येईल उपसरपंच जंगले यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत