कणगर येथे भारतीय स्टेट बँकेकडून बँक आपल्या दारी योजनेचा शुभारंभ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कणगर येथे भारतीय स्टेट बँकेकडून बँक आपल्या दारी योजनेचा शुभारंभ

राहुरी फॅक्टरी(वेबटीम) कनगर ग्रामपंचायत व भारतीय स्टेट बँक देवळाली प्रवरा यांनी आयोजीत केलेल्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना नागरिकांनी बँकेक...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)




कनगर ग्रामपंचायत व भारतीय स्टेट बँक देवळाली प्रवरा यांनी आयोजीत केलेल्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना नागरिकांनी बँकेकडून मोबाईल क्रमांकावर आलेला ओ टी पी कुणालाही देऊ नये असे आवाहन भारतीय स्टेट बँकेचे मुख्य महाप्रबंधक  अनिरुद्ध चौधरी  यांनी केले आहे 

कनगर ग्रामपंचायत व भारतीय स्टेट बँक शाखा देवळाली प्रवरा यांचे संयुक्त विद्यमाने कनगर येथे बँक आपल्या दारी या योजने अंतर्गत केवायसी करणे, नवीन खाते उघडने, २० रुपयात २ लाखाचा अपघात विमा उतरविणे शेती व इतर कर्जाची माहिती देणे, अपघात विमा योजना मंजूर झालेल्या मयताच्या वारसाना विमा रक्कम वितरण करणे यासाठी कॅम्प आयोजीत करण्यात आला होता .अध्यक्षस्थानी सरपंच सर्जेराव घाडगे होते.

यावेळी बोलताना श्री अनिरुद्ध चौधरी यांनी उपस्थित महिला व पुरुष खातेदारांना मार्गदर्शन करताना भारतीय स्टेट बँक राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच शेतकऱ्यांनी पिक कर्जाचा लाभ घ्यावा. 

यावेळी क्षेत्रीय महाप्रबंक इकबाल हुसेन, कृषी विभागाचे धनाजी भागवत, वित्तीय समावेशन अधिकारी  अमोल चावरे,  जितेंद्र त्यागी, देवळालीचे शाखाधिकारी नीरज सिंग,एसबीआय पेमेन्टचे फील्ड ऑफिसर मनोज गुंजाळ, सिद्धार्थ जगताप, दत्तात्रय येवले, सुहानी साळवे, प्रमिला जगताप ,शुभांगी मकासरे अमोल जवने, नवनाथ शेलार, सुमित शेलार सह अधिकारी कर्मचारी महिला बचत गटाच्या समन्वयक सुरेखा भांड तसेच उपसरपंच बाळासाहेब गाढे, मोहम्मद  इनामदार, बाबासाहेब गाडे तंटामुक्तीचे अध्यक्ष गोविंदराव दिवे, सोसायटीचे चेअरमन अण्णासाहेब शेटे,  सुभाष नालकर अण्णासाहेब गाढे ,भाऊसाहेब घाडगे, राजेंद्र दिवे जयसिंग घाडगे ,शंकर जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

 
कार्यक्रमात स्वागत करताना सरपंच सर्जेराव घाडगे  यांनी कणगर येथे ग्राहक सेवा केंद्राची व सीएसआर फंडाची मागणी केली असता महाप्रबंधक अनिरुद्ध चौधरी  यांनी तात्काळ त्यास मान्यता देऊन अधिकाऱ्यांना अंमलबजावणीचे आदेश दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत