राहुरी फॅक्टरीचे गजानन उर्फ नितीन घुगरकर यांना आंतरराष्ट्रीय MDRT 2024 सन्मान - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीचे गजानन उर्फ नितीन घुगरकर यांना आंतरराष्ट्रीय MDRT 2024 सन्मान

राहुरी फॅक्टरी(वेबटीम) दा नांग, व्हिएतनाम येथे टाटा एआयए लाइफ इन्शुरन्सतर्फे आयोजित MDRT Training Conclave मध्ये राहुरी फॅक्टरीचे रहिवाशी व ...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



दा नांग, व्हिएतनाम येथे टाटा एआयए लाइफ इन्शुरन्सतर्फे आयोजित MDRT Training Conclave मध्ये राहुरी फॅक्टरीचे रहिवाशी व टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स कंपनीचे चीफ लाईफ प्लॅनर गजानन उर्फ नितीन घुगरकर यांना MDRT 2024 Trophy ने सन्मानित करण्यात आले.


MDRT (Million Dollar Round Table) हा जीवन विमा क्षेत्रातील जागतिक स्तरावरील सर्वोच्च सन्मान असून, हा मान मिळविणारे सल्लागार अत्यंत प्रतिष्ठित दर्जाचे मानले जातात. श्री. नितीन घुगरकर यांची निवड या प्रशिक्षण संमेलनासाठी झाली होती आणि 20 ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला.

टाटा एआयए लाइफ इन्शुरन्सने सलग तिसऱ्या वर्षी भारतातील सर्वाधिक 2871 MDRT सल्लागार घडवण्याचा मान मिळवला आहे. 


गेल्या १० वर्षांपासून जीवन विमा व आरोग्य विमा क्षेत्रात प्रामाणिक व पारदर्शक काम करत असलेले श्री. नितीन घुगरकर हे आयआरडीए प्रमाणित विमा प्रतिनिधी आहेत. २०२४ कॅलेंडर वर्षात त्यांनी तब्बल ४९ कुटुंबांना ₹४० कोटींचा लाइफ इन्शुरन्स कव्हर देऊन त्यांचे भविष्य सुरक्षित केले आहे.


त्यांच्या या उल्लेखनीय यशामागे १६ वर्षांचा इन्शुरन्स अनुभव असलेले टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स कंपनीचे सीनियर बिझनेस पार्टनर लीडर व शिवाई असोसिएट्सचे प्रमुख राहुल शिवाजीराव ठाणगे यांचे मार्गदर्शन लाभले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत