तांदुळवाडी शाळा व गावाला कोणी बदनाम करण्याचे काम करू नये- विनीत धसाळ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

तांदुळवाडी शाळा व गावाला कोणी बदनाम करण्याचे काम करू नये- विनीत धसाळ

राहुरी (प्रतिनिधी) -  तांदुळवाडी जिल्हा परिषद शाळेने नुकतेच शंभर वर्ष पूर्ण केले. शाळेच्या परिसरात सर्व आवश्यक त्या सुविधा उपलब्ध आहेत. पटसं...

राहुरी (प्रतिनिधी) - 



तांदुळवाडी जिल्हा परिषद शाळेने नुकतेच शंभर वर्ष पूर्ण केले. शाळेच्या परिसरात सर्व आवश्यक त्या सुविधा उपलब्ध आहेत. पटसंख्या वाढीसाठी शाळा व्यवस्थापन समिती व सुज्ञ नागरिक सातत्याने प्रयत्नशील आहेत. परंतु गावाचे प्रथम नागरिक म्हणून ज्यांची जबाबदारी आहे त्यांनी केवळ राजकीय हेतूने शाळेची व गावाची बदनामी  करू नये. गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून शाळेच्या प्रगतीसाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत हे सर्व गावाला माहिती असल्याचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनीत धसाळ यांनी म्हटले आहे.

        तांदुळवाडी जिल्हा परिषद शाळेच्या स्वच्छतागृहाच्या मुद्द्यावर केलेल्या आरोपांना उत्तर देताना विनित धसाळ यांनी सांगितले की, शाळा हे शिक्षणाचे मंदिर आहे. तांदुळवाडी गावातील जिल्हा परिषद शाळेला मोठी परंपरा आहे. या शाळेने नुकतेच १०० वर्ष पूर्ण केल्याने शताब्दी वर्ष सोहळा कार्यक्रम संपन्न झाला. यानिमित्त गावातील शाळेचे जुने विद्यार्थी जेष्ठ नागरिक आजी-माजी सैनिक, शिक्षक, विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेले विद्यार्थी यांचा सन्मान करण्यात आला होता तसेच शंभर झाडे वृक्षारोपण करण्याचा कार्यक्रम देखील नुकताच संपन्न झालेला आहे. त्यापूर्वी शाळेतील अनेक वर्षांपासूनचे प्रलंबित असलेले प्रश्न त्यामध्ये संरक्षण भिंत, शाळा खोल्यांची दुरुस्ती, पडवी व वर्गातील फरशी, जुने पत्रे बदलणे, विद्यार्थ्यांना जेवणासाठी डायनिंग, शाळेचे रंगकाम आदी कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत. स्वच्छतागृहाची ठराविक कालावधीत स्वच्छता केली जाते. गावाच्या व शाळेच्या विकासात सर्वांची सकारात्मक असली पाहिजे शाळेच्या सुविधेमध्ये काही उणिवा असतील तर त्या दुरुस्त करून देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची देखील आहे. ज्यांचे पिढीतील कोणी या शाळेत शिकले नाही त्यांनी राजकीय हेतूने आत्मीयता दाखविणे केविलवाणे आहे. ३५ वर्षांत ज्यांनी प्रथम शाळेत पाऊल ठेवले, ज्यांचे शालेय शिक्षण मोठ्या शहरामध्ये झाले. त्यांना जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची व्यथा समजणार कशी? शाळेच्या स्वच्छतागृहाची स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची सुध्दा आहे. असा प्रश्न उपस्थित करून आमची मुले, आम्ही, आमचे वडील या शाळेत शिकले याचा आम्हाला अभिमान आहे. किमान शाळेच्या आवारात कोणी राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये. शाळेचा पट सध्या ४५ असून सात वर्ग व दोनच शिक्षक आहेत त्यामुळे नव्याने शाळेला खोली बांधण्याची कोणतीही आवश्यकता नाही असा ठराव शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत करण्यात आला आहे. जिल्हा परिषद शाळेत होणारे मोठे कार्यक्रम कोणाला सहन होत नाही म्हणून शाळेवर वेगळ्या पद्धतीचे आरोप सहन केले जाणार नाही. विद्यार्थ्यांची काळजी घेण्यास, शाळेला सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती व सुज्ञ नागरिक सक्षम आहेत असे देखील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनित धसाळ म्हटले आहे.


तांदुळवाडी शाळेतील विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी ग्रामपंचायतने निर्णय घेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची पाणीपट्टी भरण्याची घोषणा केली मात्र शाळेबद्दल कळवळा दाखविणारांचीच मुले इंग्रजी माध्यमाच्या अथवा इतर शाळेत जातात त्यांना जि.प.शाळेबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का? असा प्रश्न पालक व सुज्ञ ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत